छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायगड येथे निर्माणाधीन हनुमान मंदिरावर (Hanuman Temple) एका धर्मांतरित ख्रिस्त्याने जेसीबी चालवल्याची संतापजनक घटना घडली आहे. भाठनपाली गावातील रहिवासी निर्मल सारथी याने हे कृत्य केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वीच त्याने मंदिरावर जेसीबी चालवल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – ‘ब्रम्होस’ने आमचा नियोजित कट उधळून लावला ; पाकिस्तानचे पंतप्रधान Shahbaz Sharif यांची कबुली)
निर्मल सारथी यांच्या घरासमोर हनुमान मंदिर बांधले जात होते. सरपंच जसकेत झरिया यांनी सांगितले की, काही काळापूर्वी ख्रिस्त्यांनी त्याला आमिष दाखवून धर्मांतर (conversion) केले. त्यानंतर निर्मलने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. धर्म परिवर्तनानंतर तो मंदिर हटवण्याची मागणी करू लागला. याआधीही तो फावडे घेऊन मंदिरात तोडफोड करण्यासाठी आला होता.
गुरुवार, २९ मे २०२५ या दिवशी निर्मलने मंदिरावर जेसीबी चालवला. घटनास्थळी हिंदू संघटनेचे कार्यकर्तेही पोहोचले आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community