Chhatrapati Shivaji Maharaj : ११ मेला होणार राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

दि. ०३ मे रोजी नियोजित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. दि. ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

34

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या पुतळ्याचे अनावरण सुधारित तारखेनुसार होणार आहे.  या अनावरण सोहळ्यास इतरही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दि. ०३ मे रोजी नियोजित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. दि. ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)चा नवा पुतळा साकारण्याची जबाबदारी प्रसिध्द शिल्पकार राम सुतार यांच्या खांद्यावर टाकली. छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा हातात तलवार घेतलेला असेल. पूर्वीचा पुतळा २० फुटांचा होता व नवा पुतळा त्यापेक्षा उंच म्हणजे ६० फूट असावा, अशी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांची कल्पना होती.

विशेष म्हणजे राजकोट किल्ल्यावरील पुतळा साकारताना छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या वेशभूषेचा अभ्यास करण्यात आला असून चबुतऱ्यावर हा पुतळा उभारला जाणार आहे. पद्मभूषण राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पुर्णत्वास आले आहे.(Chhatrapati Shivaji Maharaj)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.