जिल्हा न्यायालयात जुन्या व निकाली निघालेल्या ५४२ मोटार वाहन अपघात दावे (Motor Accident Claims) प्रकरणातील ४ कोटी ३० लाख ६२ हजार ८१५ रुपये नुकसान भरपाईची अवितरीत रक्कम संबंधित पक्षकारांना देण्यात येणार आहे. या सर्व पक्षकारांची यादी www.aurangabad.dcourts.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर आहे. संबंधित पक्षकारांनी जिल्हा न्यायालयात संपर्क साधून आपली रक्कम प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी केले आहे.
(हेही वाचा – Operation Sindoor : भारत – पाक तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग युएईला हलवण्याची नामुष्की)
सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील मोटार अपघात दावे (Motor Accident Claims) प्रक्ररणातील अवितरीत रक्कम संबंधिताना प्रदान करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण ५४२ प्रकरणात ४ कोटी ३० लाख ६२ हजार ८१५ रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम अवितरीत आहे. अशा ५४२ लोकांची यादी ही www.aurangabad.dcourts.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर आहे. लोकांनी ही यादी पहावी. त्यानुसार येत्या आठ दिवसांच्या आत संबंधितांनी आपल्या रकमा सहा. अधीक्षक, वित्त व लेखा विभाग, ३ रा मजला, जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहून रक्कम तात्काळ घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहा. अधीक्षक लेखा विभाग ०२४०-२३५३१५८, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय ०२४०-२३३४८३९, अधीक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण -८५९१९०३६२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community