Chartered Officer Transfer : चंद्रकांत पुलकुंडवार पुणे विभागीय आयुक्तपदी; सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली सहकार आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. राव यांच्या जागी म्हणजे पुणे विभागीय आयुक्त म्हणून चंद्रकांत पुलकुंडावर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांची बदली साखर आयुक्त म्हणून झाली आहे.

255
Chartered Officer Transfer : चंद्रकांत पुलकुंडवार पुणे विभागीय आयुक्तपदी; सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या (Chartered Officer) बदल्यांचे सत्र सुरु असून सोमवारी (०५ फेब्रुवारी) राज्य सरकारने सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या (Chartered Officer Transfer) केल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली सहकार आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. राव यांच्या जागी म्हणजे पुणे विभागीय आयुक्त म्हणून चंद्रकांत पुलकुंडावर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांची बदली साखर आयुक्त म्हणून झाली आहे. (Chartered Officer Transfer)

(हेही वाचा – Cabinet Meeting : नमो मेळाव्यांमधून दोन लाख रोजगार निर्मिती; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची नेमणूक हाफकिन बायोफार्मा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. खिल्लारी यांची संचालक, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, पुणे येथे बदली झाली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची नेमणूक सह व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे. चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगननाथम एम. यांची बदली गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर यवतमाळ जिल्ह्यातील सहाय्यक जिल्हाधिकारी यशनी नागराजन यांची बदली सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. (Chartered Officer Transfer)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.