Chandoli Sanctuary : चांदोली अभयारण्य आजपासून सुरू, नवी सुविधा ‘काय’ असणार? जाणून घ्या …

46
Chandoli Sanctuary : चांदोली अभयारण्य आजपासून सुरू, नवी सुविधा 'काय' असणार? जाणून घ्या ...
Chandoli Sanctuary : चांदोली अभयारण्य आजपासून सुरू, नवी सुविधा 'काय' असणार? जाणून घ्या ...

पश्चिम महाराष्ट्रातील राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले सांगलीमधील चांदोली राष्ट्रीय अभयारण्य (Chandoli Sanctuary) आजपासून (१५ ऑक्टोबर) पर्यटकांसाठी सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात ते बंद ठेवण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या आणि पर्यटकांचे माहेरघर म्हणून चांदोली अभयारण्याची ओळख आहे. येथील धरण परिसरही प्रसिद्ध आहे. वाढत्या पर्यटनामुळे राज्यभरात चांदोली अभयारण्य प्रसिद्धिच्या झोतात आहे. अनेक पर्यटक येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घेतात. सुट्टीच्या दिवसांतही ५ हजारांहून जास्त पर्यटक या अभयारण्याला भेट देऊन येथील वन्यजीवनाचा, नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतात.

पर्यटकांचा प्रतिसाद वाढाव यासाठी जिल्ह्यातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना चांदोल अभयारण्य पाहण्यास आणावे, जेणेकरून येथील वनसंपदा, प्राणीसंपदा पाहता येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. येथे पर्यटकांना बिबट्या, अस्वल, गवे, साप, असंख्य जातीचे पक्षी पाहण्याची संधी मिळू शकते. येथील वारणा नदीवरील चांदोलीचे धरण पाहायला अनेक पर्यटक येतात, मात्र त्याकरिता पाटबंधारे विभागाकडून स्वतंत्र परवानगी घेऊन शुल्क भरून प्रवेश दिला जातो.

सोयीसुविधा – (facility)

– पर्यटकांसाठी दोन बसची सोय. एक २५ क्षमता, दुसरी १७ क्षमता

– प्रतिपर्यटक – मुलांसाठी २०० रुपये, मोठ्यांसाठी २५० रुपये शुल्क (प्रवेश, गाईड, प्रवास एकत्रित)

– शिराळा तालुक्यातील शाळकरी मुलांना ७५ टक्के सूट, बफर झोनमधील शाळांना मोफत प्रवेश

– पर्यटकांच्या खासगी वाहनांचा ग्राऊंड क्लिअरन्स चांगला असेल तर गाईडसमवेत नेता येते.

– हलक्या वाहनास १५०, मोठ्या वाहनास २५० रुपये शुल्क

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.