देशातील अनेक वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सची नजर; सरकारकडून सतर्कतेचा इशारा

122

सध्या डिजिटल युगाची सर्वत्र सुरुवात झाली आहे. त्यामुळे माणसांच्या अनेक समस्या कमी झाल्या आहेत. माणसांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. जगभरातील अनेक व्यवहार घर बसल्या होत आहे. मात्र आपल्याला नाण्याची दुसरी बाजू विसरून चालणार नाही. इंटरनेटमुळे आयुष्य जितके सोपे झाले आहे, तितकेच इंटरनेटमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढली आहे. ‘सायबर क्राईम’ सारख्या प्रकारचा जन्म झाला आहे. इंटरनेटद्वारे केल्या जाणार्‍या गैरवापरास ‘सायबर क्राईम’ म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने भारतातील जवळपास १२ हजार सरकारी वेबसाईट यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ सी) यांनी गुरुवारी १३ एप्रिल २०२३ रोजी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. इंडोनेशियातील काही हॅकर ग्रुप भारतातील जवळपास १२ हजार सरकारी वेबसाईट्सवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समजताच, सरकारकडून हा इशारा देण्यात आला आहे.

सायबर क्राईमच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक ते एखाद्या देशाची सर्व प्रकारची व्यवस्था ढासळू शकते, इतकी त्याची व्याप्ती आहे. साधारणत: सायबर क्राईमचे तीन प्रकार दिसून येतात. पहिला ’डेटा थेप्ट’, दुसरा ‘सायबर स्टॉकिंग’ आणि तिसरा प्रकार म्हणजे ‘हँकिंग’. पहिल्या प्रकारात इंटरनेटवरील माहिती पेनड्राईव्ह, डेटा बँक आणि सीडीचा वापर करून चोरली जाते. तसेच दुसऱ्या प्रकारात ई-मेल, सोशल सर्फिंग, आणि चॅटिंगच्या माध्यमातून माहिती चोरली जाते. तर हॅकर हा तिसरा प्रकार आहे.

(हेही वाचा – अमेरिकेतील डेअरी फार्ममध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.