Central Railway सुधारित संरचनेसह गाड्या चालवणार

20
Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' मार्गांवरुन धावणार नवीन एक्‍सप्रेस गाडी
मध्य रेल्वेने (Central Railway) खालील गाड्या एलएचबी कोच आणि सुधारित संरचनेसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे

ट्रेन क्रमांक 17614/17613 हुजूर साहेब नांदेड- पनवेल- हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 17630/17629 हजूर साहेब नांदेड – पुणे – हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेसची सुधारित संरचना खाली दिली आहे:-एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन.

(हेही वाचा Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले; पाकिस्तानसह ‘या’ देशांचाही समावेश)

ट्रेन क्रमांक 17641/17613  हुजूर साहेब नांदेड – पनवेल – हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक १ मे २०२५ पासून हुजूर साहेब नांदेड येथून सुधारित संरचनेसह चालेल आणि दिनांक २ मे २०२५ पासून पनवेल येथून सुधारित संरचनेसह चालेल.  (Central Railway)

गाडी क्रमांक 17630/17629  हुजूर साहेब नांदेड -पुणे- हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक ३ मे २०२५ पासून हुजूर साहेब नांदेड येथून सुधारित संरचनेसह चालेल आणि दिनांक ४ मे २०२५ पासून पुणे येथून सुधारित संरचनेसह चालेल.

या विशेष गाडीच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करा. (Central Railway)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.