Central Railway News: सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेल्या ‘मध्य रेल्वे’ची वाहतूक सुरळीत

94
Central Railway News: सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेल्या 'मध्य रेल्वे'ची वाहतूक सुरळीत
Central Railway News: सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेल्या 'मध्य रेल्वे'ची वाहतूक सुरळीत

Central Railway News: मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील लोकल (Mumbai Local) सेवांसह एक्सप्रेस गाड्या विस्कळीत झाल्या होत्या. मात्र, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला, तरी या मार्गावरील गाड्या उशिरानं धावत आहेत. अशी प्रवाशांची तक्रार आहे. (Central Railway News)

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा ते कल्याण (Kasara to Kalyan) यादरम्यानच्या रेल्वे रुळाच्या जवळच पोकलेन वापरून एक काम केले जात होते. मात्र या पोकलेनचा धक्का सिग्नल यंत्रणेच्या वायरला लागला आणि सिग्नल यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या सहा लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागले होते. त्यामुळे ऑफिसला निघालेल्या चाकरमान्यांना लेटमार्कचा (latemark) फटका सहन करावा लागला आहे.

(हेही वाचा – Water Shortage: अमर महल जंक्शन येथील जलवाहिनीला गळती: २४ तास पाणीपुरवठा बंद)

दरम्यान, एक्स्प्रेस गाड्यांच्या (Express train) वाहतुकीवरही परिणाम झाला असून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.