Central Railway : मेल एक्सप्रेस १३० किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी यशस्वी

भुसावळ-इगतपुरी विभागात प्रयोग

86
Central Railway : मेलएक्सप्रेस १३० किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी यशस्वी
Central Railway : मेलएक्सप्रेस १३० किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी यशस्वी

भुसावळ विभागातील मध्य रेल्वेच्या ( Central Railway)५२६.७६ किलोमीटर लांबीच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात सहा मेल एक्सप्रेस प्रवासी गाड्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर ताशी १३० किलोमीटर प्रति वेगाने चालविण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा गितांजली एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वे गाड्या इगतपुरी-भुसावळ मार्गावर १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावल्या. डाऊन दिशेने या गाड्यांच्या वेळेत २८ मिनिटांची बचत झाली तर अप दिशेत ३० मिनिटांची बचत झाली आहे.

(हेही वाचा : Hemant Parakh kidnaped : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे राहत्या घरासमोरुन अपहरण)

यापुढे भुसावळ विभागात एकूण ६७ रेल्वे प्रवासी गाड्या १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. उपरोक्त सहा मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वेगाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे आता १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या नियमित धावण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.