Central Railway : सीएसएमटी -धुळे दैनिक एक्सप्रेस सुरू, मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहीर

पनवेल-नांदेडदरम्यान ४ अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

148
Central Railway : सीएसएमटी -धुळे दैनिक एक्सप्रेस सुरू, मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहिर
Central Railway : सीएसएमटी -धुळे दैनिक एक्सप्रेस सुरू, मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहिर

धुळेकरांना दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेने (Central Railway) आनंदाची बातमी दिली आहे. रविवार, १२ नोव्हेंबरपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते धुळेदरम्यान दैनिक एक्सप्रेस सुरू होत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-धुळे दैनिक एक्सप्रेस गाडी क्र. ११०११ ही १२ नोव्हेंबरपासून दररोज सीएसएमटी येथून दुपारी १२ वाजता सुटेल आणि रात्री ८.५५ वाजता धुळे येथे पोहोचेल, तर गाडी क्र. ११०१२ धुळे-सीएसएमटी दैनिक एक्सप्रेस दररोज सकाळी ६.३० वाजता धुळे येथून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी २.१५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

सीएसएमटी -धुळे दैनिक एक्सप्रेसला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. याचे तिकिट आरक्षणही सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून xद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच पनवेल-नांदेडदरम्यान ४ अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठपूजेदरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन हे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.