मध्य रेल्वेने “फक्त एक पृथ्वी” संकल्पनेनुसार जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा केला

97

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या अनुषंगाने मध्य रेल्वेत जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा करण्यात आला, या वर्षीच्या “केवळ एक पृथ्वी” या थीमवर लक्ष केंद्रित करणारे उपक्रम सुरू करण्यात आले.

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी २०० किलोलिटर डेली (KLD) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स, वाडीबंदर, मुंबई येथे केली. ए.के. गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि इतर विभागांचे प्रमुख, विभागीय शाखा अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) चे वरिष्ठ प्रधान शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनीवाले हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी पर्यावरणीय शाश्वततेमध्ये या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे महत्त्व स्पष्ट केले.

लवकरच सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रे बनवणार

अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार सोहळ्यात मध्य रेल्वेने सलग तिसऱ्यांदा पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड जिंकली आहे. ही मध्य रेल्वेची पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी दर्शवते. ते म्हणाले की मध्य रेल्वेत १५८ ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स आहेत. ३ ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट आहेत, ज्यामुळे जलसंधारणात मदत झाली आहे. येत्या काही वर्षांत शून्य विसर्जनाच्या दिशेने आणखी सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रे स्थापित केली जातील.

 

शाश्वत उपाय

महाव्यवस्थापक पुढे म्हणाले की, मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरणीय प्रणालीचे पुनरुज्जीवन आणि पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांमध्ये विविध ठिकाणी ५ लाखांहून अधिक झाडे लावली. भुसावळ येथे २ आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एक असे एकंदर ३ मियावाकी वृक्षारोपण, १५ ठिकाणी रोपवाटिका, एक ऑक्सिजन पार्लर, ८५% जगण्याच्या दरासह हर्बल गार्डन लावण्यात आले. मध्य रेल्वेत मैला व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धीकरण संयंत्रे आहेत ज्याद्वारे दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी मिळते जे पर्यावरणातील प्रदूषित पाण्याचे विसर्जन दूर करण्यासोबतच वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून कामी येत आहे.

कंपोस्ट प्लांट

लाखो प्रवासी आणि वाहतूक उपक्रम हाताळणाऱ्या रेल्वेसारख्या विशाल वाहतूक संस्थेसाठी कचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. मध्य रेल्वेने अन्न, भाजीपाला आणि फळांच्या कचऱ्याचे चांगल्या कंपोस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी भुसावळ आणि लोणावळा स्टेशन, पुणे येथील रेल्वे कॉलनी आणि माटुंगा वर्कशॉप येथील बागांमध्ये वापरण्यासाठी कंपोस्ट बिन आणि कंपोस्ट टंबलर प्लांट बसवले आहेत. प्लॅस्टिकच्या धोक्याचा सामना करण्यासाठी ३७ स्थानकांवर ४८ प्लास्टिक बाटली क्रशिंग मशीन बसविले आहेत. मध्य रेल्वेतील ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये १००% बायो-टॉयलेट बसवलेले आहेत, जे ताजे आणि निरोगी वातावरण राखण्यात मदत करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.