मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागातील दिवा – मुंब्रा दरम्यान पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक (Special Block) घेण्यात येणार आहे. रविवारी आणि मंगळवारी रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Central Railway Night Block)
(हेही वाचा – Memory of the World Register : श्रीमद् भगवद्गीता, भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा गौरव ! युनेस्कोने घेतली दखल)
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दिवा ते मुंब्रा (Diva to Mumbra Night Block) दरम्यान अप मार्गावर रविवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १२१८१ मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दिवा येथे रात्री ३.०५ ते रात्री ३.३० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण येथे रात्री ३ ते रात्री ३.१५ दरम्यान थांबवण्यात येईल. मंगळवारी रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
(हेही वाचा – New Market Committees : शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारचे ठोस पाऊल ; नव्या बाजार समित्या स्थापन करण्यास मंजुरी)
या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक १२१०२ शालिमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दिवा येथे रात्री ३.०५ ते रात्री ३.३० पर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण येथे रात्री ३ ते रात्री ३.१५ वाजेपर्यंत थांबवण्यात येईल. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे (Local Railway) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community