Metro विस्ताराला केंद्राचे पूर्ण सहकार्य; राज्यात कुठे आणि कसा होणार विकास ?

37
Metro विस्ताराला केंद्राचे पूर्ण सहकार्य; राज्यात कुठे आणि कसा होणार विकास ?
  • प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नागरी विकास आणि मेट्रो प्रकल्पांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत राज्यातील ११ महानगरपालिकांमध्ये सुरू असलेल्या ६४८ किमी लांबीच्या मेट्रो (Metro) प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. खट्टर यांनी मुंबईसारख्या महानगरांसाठी मेट्रो प्रकल्प अपरिहार्य असल्याचे सांगितले आणि आगामी प्रकल्पांसाठी केंद्र-राज्य ५०:५० भागीदारीत काम करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी राज्याने लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी सुचवले.

(हेही वाचा – NCP : “राष्ट्रवादी समोर निवडणुकीआधी अडचणी वाढल्या; शहराध्यक्षांचा राजीनामा”)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकात्मिक वाहतूक व्यवस्थेवर भर देताना रेल्वे, बस आणि मेट्रोसाठी एकत्रित तिकीटप्रणाली लागू केल्याचे नमूद केले. त्यांनी पुण्यातील दोन नवीन मेट्रो (Metro) प्रकल्पांना केंद्राने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. राज्याने काही मेट्रो प्रकल्प स्वनिधीतून राबवले असून, केंद्राची ५०% भागीदारी मिळाल्यास मेट्रो विस्ताराला गती मिळेल, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – वर्सोव्यातील राजे निवास अनधिकृत; BMC ने चालवला हातोडा )

फडणवीस यांनी मुंबई आणि एमएमआरमधील गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थी निकषात बदलाची गरज व्यक्त केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि अमृत योजनेसाठी मिळालेल्या निधीचा प्रभावी वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राने २०२३ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने निधी आणि सहकार्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Metro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.