महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवं पोर्टल!

95

जगभरात ई-कॉमर्स व्यवसायाची वेगाने वाढत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस जीईएम नावाचे पोर्टल सुरू केले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्राकडून हे राष्ट्रीय अभियान पुण्यात सुरू करण्यात आले आहे. ५०० हून अधिक महिलांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या पोर्टलवर नोंदणी केली आहे.

जीईएम म्हणजे काय?

ई-पोर्टल जीईएम ही, ऑनलाइन मार्केटप्लेस आहे, ज्याद्वारे कोणीही व्यक्ती घरी बसून सरकारमार्फत व्यवसाय करू शकते. यावर नोंदणी केल्यानंकर सरकारी विभागांच्या मागणीनुसार पुरवठा केला जातो. कोणतीही व्यक्ती जी योग्य उत्पादन करत आहे आणि सरकारने ठरवून दिलेल्या मानकाचा माल बनवत आहे, अशा व्यक्ती या जीईएम पोर्टलवर उत्पादनांची विक्री करू शकतात.

जीईएमची वैशिष्ट्य

कारागीर, विणकर, सूक्ष्म उद्योजक, महिला, आदिवासी उद्योजक आणि स्वयं-सहायता गट यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. जीईएम पोर्टलवरून जवळपास साडेसात लाख महिलांना लाभ देण्याचे ध्येय आहे. सुमारे ३५ लाख हातमाग कामगार आणि २७ लाख हस्तकला कारागिरांना पोर्टलमुळे एक बाजारपेठ उपलब्ध होईल. जेणेकरून ते त्यांचे उत्पादन सहज विकू शकतील.

( हेही वाचा : बापरे! ओमिक्रॉनची दहशत, स्वतःच्या कुटुंबाचा डॉक्टरने घेतला जीव )

पोर्टलवर अशी नोंदणी करा

नोंदणी करण्यासाठी, प्रथम तुम्हाला जीईएमच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. यूजर आयडी तयार केल्यानंतर, जीईएम वर लॉगिन करा आणि तुमच्या प्रोफाइलवर ऑफिसचा पत्ता, बँक खाते, अनुभव इत्यादी तपशील भरा. यानंतर, डॅशबोर्डच्या कॅटलॉग पर्यायावर जाऊन, तुम्हाला जे उत्पादन किंवा सेवा विकायची आहे ते निवडा.  www.gem.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणीसाठी इतर माहिती घेता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.