Avian Influenza : केरळमध्ये एव्हियन फ्लूचा धोका वाढला! तपासासाठी केंद्राने पाठवले पथक

107

केरळमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझाच्या (फ्लू) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी 7 सदस्यीय पथक केरळला पाठवले. हे पथक तपासाअंती आपला अहवाल मंत्रालयाला सादर करेल आणि हे संकट रोखण्यासाठी उपाय सुचवेल. हा इन्फ्लूएंझा (फ्लू) टाइप ए विषाणूच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे.

( हेही वाचा : पाकिस्तान झिम्बाब्वेसोबतही हरला, T20 World Cup मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर)

केरळमध्ये वाढता धोका!

जगभरातील वन्य पक्ष्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या मानवांनाही या संसर्गाचा धोका आहे. आरोग्य तज्ज्ञ या फ्लूला खूप प्राणघातक मानतात, यामुळे मानवांमध्ये मृत्यूचे प्रमाण 56 टक्क्यांहून अधिक दिसून आले आहे. मानवी संसर्ग प्रामुख्याने संक्रमित प्राणी किंवा दूषित वातावरणाशी थेट संपर्क साधून होतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी या प्रकारच्या संसर्गाचा धोका आहे अशा ठिकाणी जाणे टाळावे.

एव्हियन फ्लू हा पक्षी, कुक्कुटपालनात होणारा संसर्ग आहे, यांच्याद्वारे मानवाला संसर्ग होतो. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक दिसून आला आहे. काही प्रकरणांमध्ये, बर्ड फ्लू व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संसर्ग वाढण्याचा धोका खुल्या बाजारात जिथे अंडी आणि कोंबड्या विकल्या जातात किंवा जिथे पोल्ट्री फार्म आहेत तिथे सर्वाधिक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.