CC Road : दादर केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गाच्या सिमेंट काँक्रिटची कामे केली रद्द; मनसेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने उचलले पाऊल

395
CC Road : निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंपनीलाच अतिरिक्त दोन रस्त्यांची कामे केली बहाल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे (CC Road) काम महापालिकेच्यावतीने निश्चित करून यासाठी कंत्राटदारांचीही नेमणूक करण्यात आली होती. परंतु हे दोन्ही रस्ते सुस्थितीत असतानाही प्रशासनाने या रस्त्यांचा विकास करून कोट्यवधी रुपयांचा निधी कंत्राटदाराचा घशात घालण्याचा डाव घातला होता. परंतु हा डाव मनसेसह या भागातील रहिवाशांनी उधळवून लावला असून प्रशासनाला या विरोधामुळे या दोन्ही रस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (CC Road)

मुंबई महापालिकेच्यावतीने जी उत्तर विभागातील ०८ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सन २०२२ मध्ये हाती घेण्यात आले होते. यासाठी कंत्राटदाराची नेमणूकही करण्यात आली होती. या रस्ते कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या परिसरातील केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्ग या दोन रस्त्याचा समावेश होता. परंतु या दोन्ही रस्त्यांचा विकास यापूर्वी सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे (CC Road) झालेला आहे. मात्र हे दोन्ही रस्ते जुने झाल्याने तसेच या रस्त्यावर भेगा तथा तडे गेल्याने या जुन्या रस्त्याचा विकास सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे नव्याने करण्याचा निर्णय घेत या कामांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, हे रस्ते सुस्थितीत असल्याने याला शिवाजी पार्कमधील रहिवाशांसह मनसेने विरोध करत या रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येऊ नये अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. (CC Road)

(हेही वाचा – समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन)

केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गाजवळ सुरु असलेल्या मेटे रेल्वे कामामुळे वाहतूक पोलिस विभागाकडून रस्ता खोदकाम करण्यास ना हरकत परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर पुढील हंगामात वाहतूक पोलिस विभागाने केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गासाठी टप्प्याटप्प्याने रस्ता खोदकाम परवानगी जारी केली गेली. त्यानुसार वाहतूक विभागाचे ना हरकत मिळाल्यानंतर कंत्राटदाराने सामानाचे स्थलांतर करण्याचे काम सुरु केले. परंतु त्याच वेळी शिवाजी पार्क परिसरातील स्थानिक रहिवाशी आणि ज्येष्ठ नागरिक तसेच मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी या रस्त्यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या. यासंदर्भात देशपांडे यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी रस्ते विभागाला पत्र सादर करून या दोन्ही रस्त्याच्या सुधारणेचे काम करू नये आणि केळुस्कर रोड आणि एम. बी. राऊत मार्ग या रस्त्याची सुधारणा रद्द करावी अशी मागणी केली. त्यानुसार २३ एप्रिल २०२४ रोजी या रस्त्याच्या सुधारणेच्या प्रस्ताव रद्द करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. (CC Road)

यासंदर्भात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, केळुस्कर मार्ग आणि एम.बी.राऊत मार्ग हे दोन्ही रस्ते सुस्थितीत असतानाचा त्याची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. जर हे दोन्ही रस्ते सुस्थितीत आहेत. त्यावर खड्डे नाहीत तर मग या रस्त्याचा विकास करण्याची घाई कशाला असा सवाल करत देशपांडे यांनी आधीच या भागांत रस्त्यासह इतर विकास कामांसाठी खोदकाम सुरु असल्याने वाहतूक कोंडीचा बोजवारा उडतो, त्यात अधिक या रस्त्याचा विकास हाती घेऊन कशाला जनतेला त्रास द्यायचा. त्यातच हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. अशाचप्रकारे समर्थ व्यायाम मंदिर रोड सुस्थितीत असतानाही त्याचे काम हाती घेतले आणि आज नव्याने रस्ता करूनही त्यावर भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन रस्ते करूनही जर त्यावर भेगा पडणार असतील तर त्यापेक्षा आपले जुने आहेत ते रस्ते चांगले आहेत. त्यामुळे आम्ही आमचे रस्तेही वाचवले आणि पर्यायाने होणारा खर्चही वाचवला असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.