CC Road : रस्ते कामांमध्ये झाडांना पोहोचतोय धोका, अतिरिक्त आयुक्त बांगर झाले जागे; प्रशासनाला दिले ‘हे’ आदेश

517
CC Road : रस्ते कामांमध्ये झाडांना पोहोचतोय धोका, अतिरिक्त आयुक्त बांगर झाले जागे; प्रशासनाला दिले 'हे' आदेश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबईत सध्या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये सुरु असून या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामध्ये झाडांची पाळेमुळे जेसीबीच्या माध्यमातून तोडून टाकण्यात आली आहे. यामुळे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये अनेक झाडांना धोका निर्माण झालेला आहे. परंतु आजवर याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अतिरिक्त अभिजीत बांगर यांना आता रस्त्यांच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांकडे लक्ष वेधणे भाग पडले. बोरीवलीतील श्री अयप्पा मंदिर मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणामध्ये झाडे बाधित होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या रस्त्याचे संरेखन सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत, झाडांना हानी पोहोचणार याची काळजी प्राधान्याने घ्यावी, असे स्‍पष्‍ट निर्देश दिले आहे. त्यामुळे आजवर सिमेंटीकरण करताना झाडांना हानी पोहोचलीवली जात असताना असे आदेश जर यापूर्वी दिले गेले असते तर अनेक झाडे भविष्यात होणाऱ्या संभाव्य पडझडीपासून वाचवता आली असती. (CC Road)

रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी १६ एप्रिल २०२५ ) रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक, जोगेश्वरी पूर्व येथील हनुमान नगर, नटवर नगर, गोरेगाव पश्चिम येथील पवनबाग मार्ग आणि बोरिवली पश्चिम येथील श्री. अय्यप्पा मंदिर मार्ग येथील कामांचा समावेश होता. या पाहणीवेळी, टप्पा एक आणि टप्पा दोन अंतर्गत प्रभागनिहाय सुरू असलेल्या काँक्रिट रस्ते कामांचा आढावा घेत बांगर यांनी ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणारे काँक्रिटचे रस्ते आणि चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) पूर्ण होऊ शकणारे रस्ते यांची सविस्तर माहिती घेतली. (CC Road)

(हेही वाचा – हिंदी भाषेच्या सक्तीवर CM Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)

बोरिवली पश्चिम येथील अय्यप्पा मंदिर मार्ग येथील एल.आय.सी. वसाहतीतील रस्‍ते बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे अलिकडेच हस्‍तांतरीत झाले आहेत. या रस्‍त्‍याच्‍या रूंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी करताना काही झाडे रस्‍तेकामात बाधित होत असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यावेळी रस्ते कामात झाडे बाधित होत असल्यास रस्त्याचे संरेखन सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत, झाडांना हानी पोहोचणार याची काळजी प्राधान्याने घ्यावी, असे स्‍पष्‍ट निर्देश बांगर यांनी दिले. (CC Road)

पश्चिम उपनगरांत गुरुवारी १५ एप्रिल २०२५ रोजी एकाच दिवशी १०१ रस्त्यांच्या कामात मिळून तब्बल ३ हजार ११६ घनमीटर काँक्रिट टाकण्यात आले. त्‍याचा आढावा घेत बांगर म्‍हणाले की, रस्ते कामांची गती वाढली आहे, हे यातून सिद्ध होते आहे. कामांची गती वाढवताना कामांच्या गुणवत्तेशी वेगाचा योग्य ताळमेळ साधावा. जे रस्ते हाती घेतलेले नाहीत, त्या रस्त्यांवर खड्डे उद्भवणार नाहीत, याची दक्षता बाळगावी. अतिरिक्‍त मनुष्‍यबळाचा वापर करून उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतची (एंड टू एंड) कामे नियंत्रणात असावीत. दैनंदिन अहवाल तयार करावा. काही अडचणी असल्‍यास तातडीने वरिष्‍ठांपर्यंत त्‍या पोहोचवाव्‍यात, अशा सूचना बांगर यांनी केल्‍या. (CC Road)

(हेही वाचा – IPL 2025, Mayank Yadav : मयंक यादव लखनौच्या ताफ्यात परतला; राजस्थान विरुद्ध खेळणार?)

पाहणी दौऱ्यादरम्यान सर्व रस्त्यांच्या प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प चाचणी, क्यूब चाचणी याबरोबरच मॉइश्चर कंटेन्ट ऍप्रेटस, फिल्ड ड्राय डेन्सिटी आदी चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे परिणाम (रिझल्ट) योग्य असल्याचे निदर्शनास आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पश्चिम उपनगरे) संजय बोरसे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.