
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते सिमेंटीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून रस्त्याची ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे आता झाडांच्या मुळावर येत आहे. महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील प्रभादेवीमधील देसाई मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये हरित लवादाच्या नियमांचे पालन न केल्याने तसेच झाडांची पाळेमुळे कापण्याचा प्रयत्न झाल्याने सिमेंट काँक्रिटीकरण करणाऱ्या संबंधित कंपनीला महापालिकेच्या रस्ते विभागाच्यावतीने २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईत अशाप्रकारे रस्ते कंत्राटदाला केलेला हा पहिलाच दंड आहे. (CC Road)
(हेही वाचा – Aurangzeb च्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी हात आखडता)
अनेक रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांची मुळेच या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे जेसीबीमुळे झालेल्या खोदकामामुळे तुटली जात असून पदपथांचीही कामे सुरु असल्याने ही झाडे चारही बाजूने कमकुवत बनली जात आहे. त्यामुळे झाडांच्या बुंध्याभोवती एक बाय एक मीटरची जागा सोडून उर्वरीत जागेमध्ये खोदकाम करणे आवश्यक असताना, रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांमध्ये हा नियमच पाळला जात नसल्याने रस्त्यालगतची अनेक झाडांचे आयुर्मानच कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आता याप्रकरणात उद्यान विभागाच्यावतीने रस्ते विभागालाच नोटीस पाठवून कंत्राटदारांच्या कामांवर लक्ष द्यावे आणि नियमांनुसार कारवाई करावी अशी सूचना केली. (CC Road)
(हेही वाचा – ‘स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा टोला)
याबाबत जी दक्षिण विभागातील राजाभाऊ देसाई मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून या रस्त्यावर असलेल्या पिंपळ झाडांची मुळे या रस्ते कामांमध्ये तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. झाडांच्या मुळाभोवती एक मीटर बाय एक मीटरची जागा सोडून खोदकाम केले जावे, झाडांच्या बुंध्यांच्या परिसरात खोदकाम करण्यास बंदी असतानाही कंत्राटदाराकडून खोदकाम केले गेले असल्यामुळे या झाडांची मुळे खराब होऊन भविष्यात किंवा पावसाळ्यात झाडाला गंभीर नुकसान होऊ शकते. तसेच रस्त्यांचे काम करताना हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून रस्ते सुधारणा कामांमध्ये झाडांचे संरक्षण न केल्याने या पहिल्याच चुकीसाठी या रस्त्याचे काम करणाऱ्या जी. एल. कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई रस्ते विभागाच्यावतीने उद्यान विभागाने जारी केलेल्या नोटीसच्या आधारे करण्यात आली आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community