CC Road : विलेपार्ल्यात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये झाडाचा गेला बळी

379
CC Road : विलेपार्ल्यात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये झाडाचा गेला बळी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरु असून या रस्त्यांच्या कामांमध्ये झाडांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याने त्या झाडांना धोका पोहोचत आहे. त्यामुळे रस्ते बांधकामांमध्ये झाडांची काळजी घेतली जावी अशाप्रकारचे स्पष्ट निर्देश असतानाही विलेपार्ले पूर्व येथील जिवा महाले रस्त्यावरील झाडाची मुळे तोडण्यात आली. त्यामुळे येथील पेल्टोफोरम जातीचे झाड उन्मळून पडल्याची बाब समोर आली असून या प्रकरणी के पूर्वच्या उद्यान विभागाच्यावतीने रस्ते विभागाला नोटीस बजावण्यात आली आहे (CC Road)

विलेपार्ले पूर्व येथील जिवा महाले रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु असून या रस्त्यांच्या विकास अंतर्गत पावसाळी पाणी वाहिनी टाकण्याचे अर्थात पर्जन्य जलवाहिनीचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे रस्ते सिमेंटीकरण आणि पर्जन्य जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरु असतानाच १७ एप्रिल २०२५ रोजी येथील पेल्टोफोरम जाती एक झाड उन्मळून पडले. झाडाच्या खोडाभोवती खोलवर खोदकाम केल्याने हे झाड उन्मळून बाजूच्या सोसायटीच्या आवारात पडले. (CC Road)

(हेही वाचा – 26/11 Mumbai Attack मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता; माधव भंडारी यांचा घणाघाती आरोप)

महापालिकेच्या के पूर्व विभागातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या झाड उन्मळून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर याची पाहणी केली. त्यामध्ये रस्ते विभागाकडून पर्जन्य जलवाहिनी आणि रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करताना झाडाच्या खोडाभोवती खोलवर खोदकाम केल्याने पेल्टोफोरम जातीचे एक झाड उन्मळून सोसायटीच्या आवारात पडले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या झाडाच्या फांद्या यापूर्वी छाटण्यात आल्या होत्या. परंतु रस्ते कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे, खोदकामादरम्यान त्या झाडाच्या मुळांना नुकसान पोहोचले गेले आणि त्यात हे झाड कोसळले आहे. त्यामुळे रस्ते कामांमध्ये झाडांची अत्यंत काळजी घेण्याचे निर्देश उद्यान विभागाच्यावतीने वेळोवेळी होते, असेही असूनही इतर अनेक झाडांच्या परिसरात खोदकाम केले जाते. ज्यामुळे झाडांची मुळे उघडी राहतात आणि त्यामुळे झाडे पडण्याची शक्यता असते. (CC Road)

झाडांभोवती खोदकामाबाबत अशाप्रकारच्या घटनांबाबत नागरिक संवेदनशील असून नागरिकांकडून अशा घटनांची तात्काळ दखल घेतली जाते. त्यामुळे उद्यान विभागाच्यावतीने रस्ते विभागाला नोटीस बजावून वारंवार उत्खनन केलेल्या क्षेत्राजवळ असलेल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारच्या खबरदारीची उपाययोजन राबवली जावी. अशा सर्व प्रकल्पांमध्ये उत्खनन करताना झाडांची अत्यंत काळजी घ्यावी जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये अशा सूचना रस्ते विभागाला उद्यान विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.