Cargo ship fire : केरळमधील बेपोर किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजाला आग; बचाव मोहीम सुरू

34
केरळमधील बेपोर किनाऱ्यापासून (Beypore Beach) सुमारे ४० नॉटिकल मैल अंतरावर कंटेनर मालवाहू जहाजाला आग लागली आहे. संबंधित घटना ही सोमवारी ०९ जूनला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या आग लागलेल्या मालवाहू जहाजातील सुमारे २२ क्रू सदस्यांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि नौदलाने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आहे. (Cargo ship fire)
(हेही वाचा – Raja Raghuvanshi murder : गूढ उकलले; पत्नीला उत्तरप्रदेशातून अटक)

कोस्ट गार्डच्या सूत्रांनी सांगितले की, फीडर जहाज ६५० हून अधिक कंटेनर घेऊन कोलंबियाहून मुंबईतील न्हावाशेवा येथे जात होते. आगीमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाही.
२० कंटेनर समुद्रात बुडाले
आपत्ती व्यवस्थापन सूत्रांनी सांगितले की, सिंगापूरचे देशाचे ध्वज लावून चालेल्या या मालवाहू जहाजामधून सुमारे २० कंटेनर समुद्रात बुडाले आहेत. बचाव कार्यानंतर जखमी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी कन्नूर, कोझिकोड आणि कोची येथे वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी एर्नाकुलम आणि कोझिकोड जिल्हाधिकाऱ्यांना जहाजातील कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावर आणल्यावर त्यांच्यासाठी रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Greta Thunberg ला दहशतवाद्यांचा पुळका; इस्रायलने केली मोठी कारवाई)

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) घटनास्थळी एक पथक तैनात केले आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy)  घटनास्थळी डॉर्नियर हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. २० वर्षे जुने हे जहाज, ज्याची लांबी २६८.८ मीटर आणि एक ३२.३ मीटर आहे, कोलंबिया येथून मुंबईत येत होते. हे मालवाहू जहाज १४ नॉटिकल मैल वेगाने पुढे जात होते. २०२१ मध्ये, कोलंबियाहून सिंगापूरला जाणाऱ्या एमएससी मेसिना या कंटेनर मालवाहू जहाजाला हिंदी महासागरात आग लागली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.