भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा आदेश

107

भाडेतत्त्वावरील ५१५० इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यासंबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले. महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.

मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले, २२ मेपर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला १ हजार बसेस पुरवठा करण्याचे सुधारित वेळापत्रक दिले होते. परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे. सध्या महामंडळाला बसण्याची अत्यंत आवश्यकता असताना संबंधित संस्था जर वेळेत बस पुरवठा करू शकत नसेल तर या कंपनीसोबत केलेला निविदा करार रद्द करावा.

(हेही वाचा Aqua Line Metro पहिल्या पावसात भुयारी मेट्रोची दैना; वरळीतील आचार्य अत्रे स्थानकात भरलं पाणी, प्रवाशांनी व्यक्त केला संताप!)

शिवशाही बसेस रुपांतर हिरकणीमध्ये

सध्या एसटी महामंडळाकडे चलनात असलेल्या शिवशाही बसेसची टप्प्याटप्प्याने पुनर्बांधणी करून त्याचे रूपांतर हिरकणी (निम आराम) बसेसमध्ये करण्यात यावे. तसेच त्या बसेस पूर्वीप्रमाणे हिरव्या पांढऱ्या रंगातच असाव्यात असे निर्देश मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यावेळी दिले.

स्वच्छतेबाबत तडजोड नाही

मंत्री म्हणून राज्यातील विविध बसस्थानकाला भेट दिली असता, स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था दिसून आली. या संदर्भात प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्रुटी दाखवून दिल्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करणे अपेक्षित असताना अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही.असा सज्जड दम या वेळी मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.