-
ऋजुता लुकतुके
कॅनडाच्या नव्या मंत्रिमंडळात चार भारतीय वंशाच्या चेहऱ्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या यादीत अनिता आनंद, रूबी सहोता, रणदीप सराय आणि मनिंदर सिद्धू यांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंतचा विक्रम मोडत, २२ भारतीय वंशाचे उमेदवार संसदेत पोहोचले आहेत. पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात इतक्या मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक असणे, आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत हे चार दिग्गज आणि त्यांना कोणते पद मिळाले आहे? (Canada News)
पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांच्या २८ सदस्यीय कॅबिनेटची घोषणा केली आहे. नव्या मंत्रिमंडळात ४ भारतीय वंशाच्या व्यक्तींना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. याआधी जस्टिन ट्रुडो यांच्याकडून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मार्क कार्नी यांनी २४ सदस्यीय मंत्रिमंडळ तयार केले होते, ज्यात २ भारतीय वंशाचे सदस्य होते. (Canada News)
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’ अजून संपलेले नाही ‘हा’ फक्त एक ट्रेलर होता, पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे; राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा)
मनिंदर सिद्धू यांना आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रीपद देण्यात आले आहे. ते ब्रॅम्पटन ईस्ट येथून खासदार आहेत. अमेरिका आणि कॅनडामधील व्यापारविषयक मतभेदांमध्ये सिद्धू महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांचे बालपण कॅनडात गेले असून तेथेच त्यांनी शिक्षण घेतले आहे. याआधी ते अनेक वरिष्ठ मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणूनही कार्यरत होते. (Canada News)
रणदीप सराय यांना आंतरराष्ट्रीय विकास विषयक राज्य सचिवपद देण्यात आले आहे. त्यांनीही कॅनडामधूनच शिक्षण घेतले असून तिथल्या राजकारणात त्यांना चांगला अनुभव आहे. ते २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये खासदार म्हणून निवडून आले असून, त्यांना संसदेत चार वर्षांचा अनुभव आहे. (Canada News)
(हेही वाचा – ICC Helps Pakistan : आयसीसीकडून भारताला मिळाले १२ कोटी रुपये; पाकला किती पैसे मिळणार?)
रूबी सहोता यांना गुन्हेगारी नियंत्रण विषयक सचिवपद देण्यात आले आहे. त्या २०१५ पासून ब्रॅम्पटन नॉर्थ येथून खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सस्कॅचवान विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. व्यावसायिकदृष्ट्या त्या वकील असून, युवावर्गाशी संबंधित मुद्द्यांवर काम करत होत्या. (Canada News)
भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले आहे, जे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. ५७ वर्षांच्या अनिता यांनी याआधी संरक्षण आणि नवप्रवर्तन मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांचे वडील तमिळ तर आई पंजाबी आहेत. त्यांचा जन्म नोव्हा स्कोटियामधील केंटविल येथे झाला होता. त्यांच्या दोघेही पालक डॉक्टर असून, १९६० च्या दशकापासून ते कॅनडात राहत आहेत. कॅनडाच्या संसदेत प्रथमच २२ भारतीय वंशाचे उमेदवार पोहोचले आहेत. याआधी ही संख्या सर्वाधिक १७ होती. (Canada News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community