Cabinet Decision : विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

81
Cabinet Decision : विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
  • प्रतिनिधी

राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजीओथेरपी), व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात सहा हजाराहून अधिक रकमेची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही वाढ १ जून २०२५ अशी पूर्वलक्षी प्रभावापासून लागू होणार आहे. याशिवाय बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. (Cabinet Decision)

(हेही वाचा – परदेशातून परतलेले शिष्टमंडळ संध्याकाळी PM Narendra Modi यांच्या भेटीला, बैठकीपूर्वी करावी लागणार कोविड चाचणी)

शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षण काळात दरमहा १ हजार ७५० रुपये विद्यावेतन मिळत होते. यामध्ये ६ हजार २५० रूपयांची वाढ करून त्यांना आता दरमहा ८ हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तर याच अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना महागाई भत्त्यासह १० हजार रूपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वाढीनंतर पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३ हजार ७३० रूपये इतके विद्यावेतन मिळणार आहे. (Cabinet Decision)

(हेही वाचा – Ruturaj Gaikwad यॉर्कशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळणार)

मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या पाच ठिकाणी शासकीय परिचर्या महाविद्यालयात बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रम सुरू आहे. या प्रत्येकी ठिकाणी ५० विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांचा आंतरवासिता कालावधी सहा महिन्यांचा असतो. या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रूपये विद्यावेतन देण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. (Cabinet Decision)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.