
-
प्रतिनिधी
राज्यातील कामगारवर्गासाठी एक दिलासादायक पाऊल उचलताना, राज्य मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगरात कर्मचारी राज्य विमा निगमचे (ESIC) २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी १५ एकर गायरान जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, महाराष्ट्रातील इतर नऊ महत्त्वाच्या ठिकाणी प्रस्तावित ESIC रुग्णालयांसाठीही शासकीय जमिनी देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. उद्योगवाढीचा वेग पाहता छत्रपती संभाजीनगरात वैद्यकीय सुविधा वाढवणे गरजेचे झाले होते. शहरातील मौजे करोडी येथे हे आधुनिक रुग्णालय उभारले जाणार असून, शेंद्रा, बिडकीन, डिएमआयसी, वाळूज, चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या कामगार वर्गाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Cabinet Decision)
(हेही वाचा – महापालिका निवडणुकीची Shiv Sena कडून जोरदार तयारी! ‘जनता दरबार’ मोहिमेची रणनीती)
राज्यात इतर ठिकाणीही ESIC रुग्णालयांचा विस्तार
कामगार कल्याणाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) या ठिकाणी प्रस्तावित ESIC रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने तत्वतः मंजुरी दिली आहे. ही सर्व केंद्रे राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक आणि नागरी भागांत असून, या भागांतील मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या कामगारवर्गाच्या आरोग्य गरजांची पूर्तता करण्यासाठी ही रुग्णालये आवश्यक आहेत. (Cabinet Decision)
(हेही वाचा – Mumbai Rain : आयुक्तांनी पावसाळ्यात तुंबणाऱ्या ‘त्या’ ठिकाणांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले हे आदेश)
आरोग्य सेवेला बळकटी
ईएसआयसी रुग्णालयांची ही साखळी उभारल्याने कामगारवर्गाला सुलभ, दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्य सेवा मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. या निर्णयामुळे कामगारवर्गाच्या आरोग्य सुरक्षेत मोठी वाढ होणार असून, औद्योगिक क्षेत्राच्या सामाजिक जबाबदारीचाही हा एक सकारात्मक टप्पा ठरणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे श्रेय कामगार कल्याणाच्या दिशेने उचललेल्या पुढाकाराला जात असून, राज्यभरातील कामगारांना याचा थेट लाभ मिळणार आहे. (Cabinet Decision)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community