Accident : पश्चिम बंगालमधील ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस नाशिकमधील घाटात उलटली; २३ प्रवासी गंभीर

206

पश्चिम बंगालमधून सुमारे ५५ प्रवासी भाविकांना घेऊन निघालेली बस नाशिकमधून देवदर्शन करून पेठमार्गे गुजरातच्या सोमनाथा तीर्थक्षेत्राकडे जात होती. रविवारी, २१ जानेवारी रोजी संध्याकाळी पेठजवळ कोटंबी घाटातील धोकादायक चढावर असलेल्या तीव्र वळणावर ही बस चालकाचा ताबा सुटल्याने (Accident)  उलटली. यामुळे बसमध्ये असलेल्या सुमारे ५५ ते ६० प्रवाशांपैकी ४१ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी २३ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ३१ प्रवाशांवर नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

(हेही वाचा FMR : भारत-म्यानमारची सीमा होणार बंद; काय आहे Modi Government चे धोरण?)

संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही बस पेठजवळच्या कोटंबी घाट चढत असताना अखेरच्या टप्प्यावरील तीव्र चढ व धोकादायक वळणावर बसचालकाचा (Accident) ताबा सुटला. यामुळे बस उलटून अपघात (Accident) झाला. बसमध्ये बसलेले महिला, पुरुष प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या पाच रुग्णवाहिका व १०२ टोल-फ्री क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून जवळ असलेल्या पेठ ग्रामीण रुग्णालयात गंभीर जखमींना सर्वप्रथम हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकांमधून पुढील उपचारासाठी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.