Bullet Train Virar : बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात

Bullet Train Virar : नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

77

अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील विरार स्थानकाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरु झाले असून तो ३५.३२ मीटर लांब आणि ५० मीटर रुंद आहे. या कामासाठी १५५५ घन मीटर काँक्रीट वापरण्यात येणार आहे. (Bullet Train Virar) नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

महाराष्ट्र-गुजरातदरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरातसोबत महामुंबईमध्ये देखील वेगाने सुरू आहे. बीकेसी स्थानकानंतर विरार हे दुसरे स्थानक आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांतून बुलेट ट्रेन धावणार असून हा प्रकल्प दोन राज्यांमधील महत्त्वाचा आर्थिक दुवा ठरणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकांचा समावेश आहे. विरार स्थानकात तळमजल्यावर प्रवाशांसाठी तिकीट आरक्षण, प्रतीक्षागृह, दुकाने, लिफ्ट व सुरक्षा तपासणी केंद्र असेल. पहिल्या मजल्यावर चार ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म असणार आहेत.

 हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.