Bulldozer Action Unauthorized Masjid : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत मशिद आणि दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात साटेली-भेडशी या गावात अनधिकृतपद्धतीने चालू अलसलेल्या मदरशाला स्थानिक नागरीकांच्या विरोधातून मोठा वाद निर्माण झाला होता. आता या वादग्रस्त अनधिकृत मदरशावर पोलीसांनी बुलडोझर चालवत धडक कारवाई केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत मशिदीचा सुपडा साफ होण्यास मदत होणार आहे. (Bulldozer Action Unauthorized Masjid)
(हेही वाचा – blouse design : २०२५ सालच्या ‘या’ ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन्स आजमावून पाहा; लोक तुमच्याकडेच पाहत राहतील…)
मौलवी बिहारचा पण ठोस पुरावा नाही
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार साटेली-भेडशी गावात अनधिकृत इमारत उभारून तेथे मदरसा चालू करण्यात आला होता. या मदरशा मध्ये शिकवण देणारा मौलवी हा बिहारचा असल्याची माहिती समोर आली होती. परंतू बिहारचा नागरीक असल्याचा कोणतेही वैध पुरावा किंवा ओळखपत्र या मौलवीकडे आढळलेले नाहीत.
त्यामुळे तो बांगलादेशी नागरीक असल्याचा संशय स्थानिक नागरीकांनी व्यक्त केला होता. स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यांनुसार त्याला राष्ट्रगीत बोलण्यास सांगितले असता ते संबंधित मौलवीला बोलता आले नाही. त्यामुळे तो भारताचा नागरिक नसावा असा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.
मदरशावर बुलडोजर चालवत धडक कारवाई
याच अनधिकृत मदशाच्या इमारतीतून पोलीसांनी अवैद्य हत्यारे व तलवारी जप्त केल्या होत्या. या कारवाई दरम्यान पोलीसांनी संबधित दोनजणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान स्थानिक नागरीकांनी प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप केला होता. आता या प्रकरणी पोलीसांनी अनधिकृत मदरशावर बुलडोजर चालवत धडक कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास बघितल्यास २०१८ मध्ये या अनधिकृतपद्धतीने उभारलेल्या मदरशाच्या इमारतीची साटेली-भेडशी ग्रामपंचायतीमध्ये महसूल आकारणीसाठी नोंद झाली होती. परंतू मदरशा बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती.
(हेही वाचा – IPL 2025, Kagiso Rabada : बंदीनंतर गुजरात टायटन्सचा कासिगो रबाडा आयपीएलमध्ये परतला)
या पूर्वी मुस्लिम भंगार व्यावसायिकाच्या दुकानावर हेली होती कारवाई
‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात उत्साह निर्माण झाला. मालवण शहरात याचा आनंद साजरा केला जात असतांना शहरातील आडवण, वायरी परिसरात असलेल्या परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकांनी भारताच्या विरोधात घोषणा दिल्या. ही घटना समजताच काही हिंदूंनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता भंगार व्यावसायिकांकडून अरेरावी करण्यात आली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिहादी प्रवृत्तीच्या या व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई करून ती भुईसपाट केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community