IT Park : आयटी पार्कच्या नावाखाली इमारतींचे बांधकाम केलेल्या दादरमधील इमारतींची झाडाझडती!

विशेष म्हणजे जागेचा गैरवापर केला जात असल्याने त्या गाळेधारकाला तथा सदनिकेला आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या देयकातील रकमेच्या २०० पटीने दंड आकारले जाईल.

2912
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे

दादरमध्ये आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली बांधलेल्या इमारतीमधील घरांचा तथा गाळ्यांचा प्रत्यक्ष वापर अन्य कामांसाठी केला जात असल्याने जागेच्या गैरवापराची प्रकरणे समोर आल्याने महापालिकेने या भागातील चार ते पाच इमारतींमधील गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. जागेचा गैरवापर केल्यामुळे सध्या चार इमारतींना नोटीस जारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात अशाप्रकारे आयटीपार्कच्या नावाखाली बांधलेल्या सर्वच इमारती आता महापालिकेच्या रडारवर आल्या आहेत. त्यामुळे दादर पश्चिम भागातील सर्वच इमारतींची झाडाझडी घेण्यासाठी सुरुवात केली जाणार असून अशा प्रकारे वापर होत असलेल्या इमारतींना महापालिकेच्या वतीने नोटीस जारी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (IT Park)

पाच इमारतींमधील ‘इतक्या’ गाळेधारकांना नोटीस

दादर पश्चिम येथील काकासाहेब गाडगीळ मार्गाला जोडणाऱ्या गॅरेज गल्ली परिसरातील भवानी प्लाझा, ओम ऍनेक्स, अटलांटिका प्लाझा आणि पलई कमर्शियल तसेच राम शाम वाडी या पाच इमारतींमध्ये आयटी पार्कच्या (IT Park) नावावर एफएसआयचा लाभ घेत बांधकाम केले. परंतु याठिकाणी प्रत्यक्षात आयटी संदर्भातील कार्यालयांऐवजी चक्क गारमेंट्स सुरु आहे. त्यामुळे या पाच इमारतींमधील तब्बल ४५० गाळेधारकांना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र, यातील काहींनी पुरावे सादर केले असून त्यांची छाननी सुर आहे, परंतु यातील दोनशेहून अधिक गाळेधारकांनी अद्यापही कागदपत्रे सादर केलेले नसून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कागदपत्रांचा पुरावा सादर न केल्यास गाळ्यांवर कारवाई होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (IT Park)

(हेही वाचा – Parliament Smoke Attack : आरोपींची आधी सोशल मीडियातून मैत्री; मग संसद घुसण्याची योजना रचली)

मात्र, सध्या चार ते पाच इमारतींमध्ये आयटीच्या नावाखाली इमारतींचे बांधकाम करून एफएसआयचा लाभ घेतला असला तरी प्रत्यक्षात बांधकामातील जागेचा वापर गारमेंट्ससह अन्य कामांसाठीच केला जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे महापालिकेने ४५० हून अधिक जणांना नोटीस बजावली असली तरी अशाप्रकारे दादर पश्चिम परिसरात अशाप्रकारे आयटी पार्कच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात इमारतींचे बांधकाम झालेले आहे. त्यामुळे सध्या पाच इमारतींमधील गाळेधारकांना जागेच्या गैरवापरासंदर्भात नोटीस जारी केल्या असल्या तरी अशाप्रकारच्या सर्वच इमारतींची झाडाझडती घेतली जाणार आहे. (IT Park)

‘इतक्या’ पटीने आकारला जाणार दंड 

या झाडाझडती तसेच तक्रारींच्या आधारे त्या सर्वांना नोटीस जारी केल्या जाणार असल्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे जागेचा गैरवापर केला जात असल्याने त्या गाळेधारकाला तथा सदनिकेला आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या देयकातील रकमेच्या २०० पटीने दंड आकारले जाईल. त्यामुळे निश्चित अशाप्रकारे केवळ दादरमध्येच नाहीतर संपूर्णच मुंबईमध्ये अशाप्रकारे आयटी पार्कच्या नावाखाली बांधकाम झालेल्या सर्वच इमारतींची पाहणी करून जागेच्या गैरवापरासंदर्भात नोटीस पाठवून करनिर्धारण व संकलन विभागाच्यावतीने दंडाची रक्कम आकारली जावी. जेणेकरून महापालिकेच्या तिजोरीत महसुलाची रक्कम वाढली जाईल, असे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (IT Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.