British Parliament : लंडनम(British Parliament)ध्ये हिंदू तरुणांवर हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. लंडनमध्ये तीन हिंदू तरुणांवर हल्ला करण्यात आला असून सार्वजनिक उद्यानात धर्म विचारत बेदम मारहाण करण्यात आली. सदर घटना दि. ३० मे २०२५ रोजी घडली असून मुस्लिम जमावाकडून हिंदूवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे पडसाद ब्रिटिश संसदे(British Parliament)त उमटल्याचे समोर आले आहे.(British Parliament)
(हेही वाचा Iran-Israel War : दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीत चीनने घेतली उडी; चीनी परराष्ट्र मंत्रालय म्हणाले… )
दरम्यान, हिंदू तरुणांवर झालेल्या हल्ल्याला वांशिक व धार्मिक द्वेषाशी जोडले जात असून हाऊस ऑफ कॉमन्स(British Parliament)मध्ये युनायटेड किंगडमचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी या हल्ल्याचे वांशिक-धार्मिक द्वेषाने प्रेरित हिंसाचार असल्याचे वर्णन केले आहे. मारहाण झालेल्या हिंदू तरुणांत एक ब्रिटिश-भारतीय गुजराती व दोन श्रीलंकेचे तरुण असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा Melissa Hortman : अमेरिकेत महिला खासदाराच्या घरात घुसून गोळीबार )
खरंतर, ही घटना तीन हिंदू मुले क्रिकेट खेळण्यासाठी पार्कमध्ये गेली असताना घडली. संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास कॅफेजवळून जात असताना तिथेच ८ नागरिक बसले होते. ते सर्व मुस्लिम कुटुंबातील होते. याचे कारण त्यांच्या काही महिलांनी हिजाब परिधान केला होता. या जमावाने हिंदू तरुणांना जबर मारहाण केली. यात एका तरुणांना गंभीर दुखापत झाली. तरुणांना तातडीने नार्थविक पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांच्या चेहऱ्यावर गंभीर फ्रॅक्चर आढळून आले.
युनायटेड किंग्डमचे खासदार बॉब ब्लॅकमन काय म्हणाले?
बॉब ब्लॅकमन यांनी हाऊस ऑफ कॉमन्स(British Parliament)मध्ये भाषणात म्हटले की, हेडस्टोन पार्कमध्ये तीन तरुण हिंदू मुले क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असतानाच मुस्लिम जमाव त्यांच्याकडे आला. महत्त्वाचे म्हणजे या मारहाणीतील तिन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान, ब्रिटन पोलीस या मारहाणीकडे वांशिक हल्ला म्हणून पाहत येत आहे, असे स्थानिक लोकप्रतिनिधी बॉब ब्लॅकमन यांनी सांगितले.
I was shocked to hear of three Hindu teenagers that were attacked in Harrow last week and call on the Home Secretary to make an Urgent Statement on preventing religious attacks here in the UK.https://t.co/a52LylzKzw
— Bob Blackman (@BobBlackman) June 12, 2025
ते पुढे म्हणाले, हे प्रकरण हिंदू मुले आणि मुस्लिम पुरुषांमधील धार्मिक द्वेषाचे आहे. मारहाण झालेल्या एका तरुणाच्या बहिणीने म्हटले की, भावाने त्याच्या हातावर मंदिरातून आलेला पवित्र धागा बांधला होता. म्हणूनच कदाचित त्यांना धार्मिक कारणास्तव लक्ष्य केले गेले असावे. तिच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला केवळ वांशिकच नव्हे तर धार्मिक द्वेषाने देखील प्रेरित होता, असा अंदाज बांधण्यात येत आहे.(British Parliament)
Join Our WhatsApp Community