Book launch Ceremony: ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्तकाचे मेधा कुलकर्णी आणि सुनील देवधर यांच्या हस्ते लोकार्पण

102
Book launch Ceremony: 'छत्रपती शिवराय समजून घेताना' या पुस्तकाचे मेधा कुलकर्णी आणि सुनील देवधर यांच्या हस्ते लोकार्पण

जगद्‍गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ (Book launch Ceremony) या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील या कार्यक्रमात भाजपा नेते सुनील देवधर, रायगड स्मारकाचे सुधीर थोरात, संतोष महाराज काळोखे, नरेश गुप्ता, सेवा सारथी संस्थेचे पंकज दलाल, ओंकार मांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणले
यावेळी सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांशी संवाद साधताना शिरीष महाराज मोरे म्हणाले की, ‘मागील काही वर्षे जाणूनबुजून शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या सर्व प्रयत्नांना संदर्भासह उत्तरे देण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.’

book 1

देवधर म्हणाले की, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतरंग समजून घेण्यासाठी तरुणांना या पुस्तकाचा उपयोग होईल. या पुस्तकाचा हिंदी तसेच इंग्रजीमध्येसुद्धा अनुवाद व्हावा.’ यावेळी पिंपरी-चिंचवडमधील शिवकार्य करणाऱ्या निवडक संस्था, व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय नेते सुनील देवधर, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, संदीप जाधव, ह. भ. प. संतोष महाराज काळोखे, नरेश जी गुप्ता, सुधीर जी. थोरात, अमित घोरखे, वीणा सोनवळकर, धनंजय गावडे आणि अनेक हिंदुत्ववादी संस्था, हिंदू बांधव-भगिनी उपस्थित होते. शुभम खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिकेत मोरे यांनी आभार मानले.

पुस्तकासाठी संपर्क
“शिवराय समजून घेताना ” हे पुस्तकं जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे आवाहन यावेळी लेखक शिरीष महाराज मोरे यांनी केले. या पुस्तकाची प्रत मागवण्यासाठी 8459587113 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.