BMC जिमखान्याच्या जागेवर उभारणार टाऊनहॉल जिमखाना, महालक्ष्मी येथे उभारणार क्रीडाभवन; कसे असेल जाणून घ्या

641
BMC Sports Complex च्या पुनर्विकासास जनता दलाचा आक्षेप
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करुन याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ‘टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. ही संपूर्ण इमारत तळ मजला अधिक पाच मजल्यांची असेल. या इमारतीमध्ये काचेचा घुमट (ग्लास डोम), तसेच व्हिविंग गॅलरी असेल. या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील. त्याचप्रमाणे छतावर उपाहारगृह अर्थात रुफटॉप कॅफटेरिया देखील नियोजित आहे. तसेच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकरिता वाढीव, सुसज्ज व अत्याधुनिक क्रीडा सुविधा असणारे क्रीडाभवन हे महालक्ष्मी रेसकोर्स जवळील तुळशीवाडी येथे बांधण्यात येणार आहे. (BMC)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका मुख्यालय व सभोवतालचा संपूर्ण परिसर हा मुंबई शहरातील सर्वाधिक महत्त्वाच्या वारसाजतन प्रसीमा (हेरिटेज प्रीसींक्ट) मध्ये समाविष्ट आहे. पुरातन वारसा, वास्तूशिल्प व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या या परिसरात आझाद मैदानासारखे ऐतिहासिक प्रमुख क्रीडांगण आहे. तसेच मेट्रो ३ सेवेच्या रुपाने महत्त्वाचे स्थानकही या भौगोलिकतेमध्ये आता जोडले गेले आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या संकल्पनेनुसार व निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करुन ही ‘टाऊनहॉल जिमखाना’ इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (BMC)

New Project 2025 04 23T200220.631

(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack नंतर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी)

तळ अधिक पाच मजल्यांची इमारती

ही संपूर्ण इमारत तळ मजला अधिक पाच मजल्यांची असेल. ही वास्तू साकारताना सभोवतालच्या उच्च दर्जाच्या पुरातन वारसा (हेरिटेज) वास्तू लक्षात घेता, टाउनहॉल इमारतीची उंची ही सभोवतालच्या पुरातन वारसा वास्तूंच्या उंचीइतकी समर्पक प्रस्तावित करण्यात आली आहे, जेणेकरून या पुरातन वारसा इमारतींच्या सौंदर्य व प्रमाण यांस कोणतीही बाधा पोहचणार नाही. तसेच सभोवतालच्या परिसराची दृश्यमानताही अबाधित राहील, अशी काळजी घेण्यात येणार आहे. इमारतीची एकंदरीत रचना व बाह्य सजावट ही सभोवतालच्या वारसा जतन प्रसीमेला साजेशी करण्यात येणार आहे. (BMC)

गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट

‘टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू साकारण्यामागे प्रामुख्याने मुंबईकरांना तसेच पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकरीता शासकीय पुढाकारातून मुंबईत प्रथमच टाऊनहॉल अर्थात नगर सभागृह साकारणार आहे. परिणामी मुंबईकरांना नागरी संवादासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. त्यासमवेत या परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचादेखील विचार करण्यात आला आहे. पर्यटकांसह सर्वांना हा पुरातन वारसा परिसर विहंगम स्वरुपात न्याहाळता येणार आहे. त्यासाठी या इमारतीमध्ये काचेचा घुमट (ग्लास डोम), तसेच व्हिविंग गॅलरी असेल. या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील. त्याचप्रमाणे छतावर उपाहारगृह अर्थात रूफटॉप कॅफटेरिया देखील नियोजित आहे. (BMC)

New Project 2025 04 23T200312.654

(हेही वाचा – Unauthorised Construction वरील कारवाई आता अधिक तीव्र; पावसाळ्यापूर्वीच चालवला जाणार हातोडा)

घुमटातूनही पर्यटकांना अनुभवता येणार सभोवतालच्या पुरातन वास्तूंचे सौंदर्य

इमारतीच्या छतावर काचेपासून घडवलेल्या घुमटाची (ग्लास डोम) रचना देखील करण्यात येणार आहे. हा घुमट सभोवतालच्या पुरातन वारशाला साजेसा असेल. या घुमटातूनही पर्यटकांना सभोवतालच्या पुरातन वास्तूंचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळेल. टाऊनहॉल इमारतीमध्ये दोन तळघरांमध्ये जवळपास ६० वाहनांकरिता वाहनतळाची सुविधा असेल. परिणामी, या परिसरातील वाहनतळाची समस्या काहीशी सुटेल. या टाऊनहॉल जिमखाना वास्तूची संकल्पना महानगरपालिका वास्तुशास्त्रज्ञ विभागाने तयार केली आहे. (BMC)

New Project 2025 04 23T200359.214

आयुक्तांनी केली होती काही दिवसांपूर्वी क्रीडा भवनाच्या इमारतीची पाहणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सध्याच्या महानगरपालिका क्रीडाभवन इमारतीला भेट देऊन पाहणी केली होती. इमारतीमधील खेळाच्या सुविधा अपुऱ्या स्वरूपाच्या असून सध्याची वास्तू वापराविना आहे. तसेच इमारतीची सातत्याने दुरुस्ती करावी लागते. एवढेच नव्हे तर या परिसरात येवून क्रीडाभवन, जिमखान्याच्या सुविधांचा लाभ घेणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहज शक्य होत नाही, इत्यादी बाबी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निदर्शनास आल्या होत्या. (BMC)

New Project 2025 04 23T200511.877

(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात येत्या शनिवार आणि रविवारी राहणार पाणीकपात; काय आहे कारण?)

क्रीडा सुविधा असणारे क्रीडाभवन हे महालक्ष्मी रेसकोर्स जवळ

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकरिता वाढीव, सुसज्ज व अत्याधुनिक क्रीडा सुविधा असणारे क्रीडाभवन हे महालक्ष्मी रेसकोर्स जवळील तुळशीवाडी येथे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच रेसकोर्स सारख्या निसर्गरम्य, मोकळ्या परिसरात आहे. तेथे येण्यासाठी उपनगरीय रेल्वे, मुंबई किनारी रस्ता यांचीही सुविधा आहे. परिणामी महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना तेथे येवून सुविधांचा लाभ घेता येईल. याठिकाणी नियोजित क्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटन कोर्ट्, टेबल टेनिस, अत्याधुनिक व्यायाम शाळा तसेच जलतरण तलाव आदी सुविधांचा समावेश असेल. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.