BMC : बनावट नकाशाच्या आधारे अनधिकृतरित्या बांधकामे, ०९ तोडली, १३० रडारवर 

99
BMC : बनावट नकाशाच्या आधारे अनधिकृतरित्या बांधकामे, ०९ तोडली, १३० रडारवर 
BMC : बनावट नकाशाच्या आधारे अनधिकृतरित्या बांधकामे, ०९ तोडली, १३० रडारवर 
बनावट नकाशाच्या आधारे अनधिकृतपणे बांधण्यात आलेला बंगला पाडल्यानंतर आता  महानगरपालिका (BMC) प्रशासनाने या मोहिमेला अधिक गती दिली आहे. बनावट नकाशाच्या आधारे मढ येथे अनधिकृतपणे बांधलेली आणखी नऊ बांधकामे  महानगरपालिकेच्या पी (उत्तर) विभाग कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी ९ मे २०२५ रोजी निष्कासित करण्यात आली. या प्रकरणातील एकूण १३० अनधिकृत बांधकामे मे अखेरपर्यंत तोडण्यात येतील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे (Dr. Bhagyashree Kapse) आणि सहायक आयुक्त (पी उत्तर)  कुंदन वळवी (Kundan Valvi) यांच्या नेतृत्वात ही ही कारवाई सुरू आहे.
बनावट नकाशाचा आधार घेऊन मागील वर्षभरात मढ भागात १३० अनधिकृत बांधकामे उद्भवल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पी (उत्तर) विभाग कार्यालयाच्या वतीने निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहीम अंतर्गत, एरंगळ गावाच्या परिसरातील १५०० चौरस फूट क्षेत्रफळावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेला ‘प्रीत’ नामक बंगला हा ५ मे २०२५ रोजी पाडण्यात आला होता. ही कारवाई पुढे सुरू ठेवत शुक्रवारी  ९ मे २०२५ रोजी एरंगळसह वाळनई परिसरातील आणखी नऊ बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. यापैकी ६ बांधकामे भास्कर भोपी मार्गावरील तसेच ३ बांधकामे जोडमार्गावरील आहेत. यामध्ये ५०० चौरस फूट, ३०० चौरस फूट आणि २०० चौरस फूट क्षेत्रफळांची प्रत्येकी २ बांधकामे तसेच १५०० चौरस फूट, १३०० चौरस फूट, २५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या प्रत्येकी एका अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
तीन जेसीबी (JCB) आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने बंगल्याचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
दरम्यान, बनावट नकाशा (Fake map) प्रकरणातील एकूण १३० अनधिकृत बांधकामे मे अखेरपर्यंत निष्कासित करण्यात येतील. तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.