CC Road : निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंपनीलाच अतिरिक्त दोन रस्त्यांची कामे केली बहाल

61
CC Road : निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंपनीलाच अतिरिक्त दोन रस्त्यांची कामे केली बहाल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) दादर माहिम जी उत्तर विभागातील आठ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी मंजूर केलेल्या कामांपैंकी केवळ ६ रस्त्यांची कामे कंत्राटदाराला पूर्ण करता आली. मात्र, या कंत्राटदाराने केलेल्या कामांपैकी काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने काही भाग खोदून पुन्हा करून घेण्यात आले. परंतु, अशाप्रकारे निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंपनीला केवळ त्यांची कामे न झाल्याने शिल्लक राहिलेल्या निधीमध्ये अन्य दोन रस्त्यांची कामे बहाल करण्यात आली आहे. केवळ या कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम सुमार दर्जाचे होवून बेसुमार कामे देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाल्याचे दिसून येत आहे. (CC Road)

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) जी उत्तर विभागातील ८ रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली होती. तब्बल ३३ कोटी रुपयांची ही कंत्राट कामे डिसेंबर २०२१ मंजूर करण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये प्रत्यक्ष रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली. महापालिकेने यासाठी मेसर्स आर्मस्ट्रॉग (इंडिया) या कंपनीची नियुक्ती करून त्या पावसाळा वगळून २४ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करायचे होते. परंतु मंजूर मार्गांपैंकी केळुस्कर मार्ग आणि एम. बी. राऊत मार्गाचे काम स्थानिक रहिवाशी आणि मनसेच्या विरोधानंतर एप्रिल २०२४ रोजी रद्द करण्यात आल्यामुळे मंजूर कंत्राट निधीपैंकी काही निधी शिल्लक राहिला. (CC Road)

(हेही वाचा – देशभरात २२ राज्यांत आहेत ‘इतके’ हत्ती; राज्यात २ Elephant Sanctuaries प्रस्तावित)

परंतु दोन रस्त्यांची कामे रद्द करण्यात आल्याने तत्कालिन स्थानि आमदार सदा सरवणकर यांनी जय भारत इमारतीचा कॉर्नर ते श्री सिद्धिविनायक मंदिराचा प्रवेशद्वार या काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि पंडित सातवळेकर मार्ग अर्थात मोगल लेन या दोन रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे पत्र दिले आणि या दोन्ही रस्त्याच्या कामांच्या निविदेला विलंब होणार असल्याने यापूर्वी मंजूर कंत्राट कामातील निधी शिल्लक राहिल्याने या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या कंत्राटदाराच्या कंत्राट कामांमधून दोन रस्त्यांची कामे वगळल्याने दोन नवीन रस्त्याची कामे त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे काकासाहेब गाळगीळ मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी सुमारे ११ कोटी रुपये आणि पंडित सातवळेकर मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे साडेसहा कोटी तसेच पुरुषोत्तम गल्लीच्या कामांसाठी सुमारे १ कोटी रुपये अशाप्रकारे १८ ते १९ कोटी रुपयांची कामे संबंधित कंपनीला कामे बहाल करण्यात आली आहेत. (CC Road)

या कंपनीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील समर्थ व्यायामशाळा मंदिर, पाटील मार्ग, गॅस गल्ली आणि भंडार गल्लीतील स्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची वृत्त यापूर्वीच ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रकाशित केली होती. यानंतर समर्थ व्यायाम मंदिर रोडवरील भेगा पडलेल्या दोन ठिकाणी खोदून सुधारणा करून देण्यात आली, तर पाटील मार्गावरील भेगाच्या ठिकाणी सुधारणा करुन घेण्यात आली. मात्र गॅस गल्लीतील परिस्थिती आजही जैसे थेच आहे. मात्र, यानंतर कंत्राटदाराने दादासाहेब रेगे मार्गाचे काम चांगल्याप्रकारे करून दिले असले तरी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीला केवळ त्यांच्या कंत्राट कामातील पैसे शिल्लक राहिल्याने काम देण्याचा प्रयत्न झाल्याने नक्की प्रशासन चांगल्या दर्जाच्या कामाला महत्व देते की कंत्राटदारांना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.