नागरिकांचा सहभाग वाढवून सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी BMC करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर

337
नागरिकांचा सहभाग वाढवून सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी BMC करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

सध्या विविध कामांमध्ये नवीन व अद्ययावत तंत्रज्ञान यांचा वापर केला जात असून या नवीन तंत्रज्ञानाचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या तंत्राचा वापर मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये केला जाणार आहे. महानगरपालिकेतर्फे अनेक महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन या एआयच्या माध्यमातून भविष्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी एआय कोच हा उपक्रम महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सहभाग आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Rajasthan High Court : खरंच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो का?)

मुंबई महानगरपालिकेतील जनरेटिव्ह एआय संभाषण, डिजिटल अडॉप्शन एआय वॉकसूज, आणि स्किल्स सोलुशनच्या सब्रक्रिश्पनच्या मॉडेलचा विकास करण्यात येणार आहे. बीएमसी सिटिझन एआय कोच हा नागरिकांचा सहभाग आणि सेवा सुलभता वाढविण्याच्या दिशेने एक अभिनव उपक्रम आहे, ज्या अंतर्गत सुव्यवस्थित संवाद, व्यवहार केला जाईल तसेच आपत्कालीन माहितीचा प्रसार केला जाणार आहे. याअंतर्गत नागरिकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यास, सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यात येईल आणि महापालिकेच्या विविध सेवांबद्दल मार्गदर्शन करण्यास मदत करेल ठरेल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय त्याचवेळी, बीएमसी एम्प्लॉई एआय कोच वैयक्तिकृत शिक्षण, समस्या निवारण करण्यास मदत आणि वर्कफलोसह अखंड एकीकरण प्रदान करून कर्मचाऱ्यांकरिता ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. (BMC)

(हेही वाचा – Pahalgam Terror Update: पाकिस्तानने वाघा बॉर्डरचे दरवाजे उघडले; देशात अडकलेल्या पाक नागरिकांना मायदेशी परतण्याची दिली परवानगी)

“केंद्र शासन व राज्य शासन यांच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशासन तसेच नागरिक सेवांच्या सुविधेसाठी नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित सेवा प्रदान करण्यात मुंबई महानगरपालिका आघाडीवर आहे. महानगरपालिकेतर्फे मुंबईतील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पर्जन्य जल वाहिन्या इ. अनेक सेवा तसेच सॅप प्रणालीद्वारे आरोग्य परवाना, व्यापार परवाना, जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र आणि इतर नागरिक केंद्रित सेवा दिल्या जातात. ई-गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये नवीन तंत्रज्ञान व नवकल्पना यांचा वापर करून कामकाजात वापरसुलभता आणि पारदर्शकतेकरिता बृहन्मुंबई महानगरपलिकेने आयटी व्हिजन २०२५ जाहीर केले आहे. त्याअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या आयटी विभागाच्यावतीने या एआय कोच उपक्रमासाठी खासगी संस्थेची निवड केली असून यावर तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. डायनाकॉन्स सिस्टिम अँड सोलुशन लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (BMC)

(हेही वाचा – EDच्या प्रकरणात नवीन कायद्यांतर्गत फरार घोषित करणारी पहिलीच घटना; नेमकं प्रकरण काय वाचा)

एआय कोच उपक्रमात काय असेल?
  • एआय कोच युज केसेस/स्किल्स बृहन्मुंबई महानगरपालिका पोर्टलवर
  • रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आर. पी. ए)
  • एआय कोच चॅट आणी व्हॉइस संभाषण
  • नॉलेज बेस्ड पेजेस
  • डिजिटल ऍडॉप्शन एआय वॉकथू
  • ऑपरेशन आणि मेंटेनन्स सपोर्ट

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.