BMC : मिठी नदीतील ‘ती’ चूक पुन्हा करायला निघाले; मटेरियल टेस्टिंग महापालिका लॅब इमारतीच्या पुनर्विकासाचे कंत्राट देण्यासाठी ‘मिठी’ प्रमाणेच अट

606
बकरी ईदसाठी अनधिकृत कत्तल केल्यास BMC च्या वतीने होणार कारवाई; बाजार विभागाने नेमली तीन भरारी पथके
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेत (BMC) जी चूक प्रशासनाने केली आहे आणि त्या कामाच्या चौकशीच्या फेऱ्यात आता अधिकारी अडकू लागले आहेत, तशीच चूक पुन्हा प्रशासन करायला निघाले आहे. काही ठराविक कंपनीला काम मिळावे म्हणून त्या कंपनीसोबत सामंजस्य करार असेल तरच निविदेत भाग घेता येईल अशी अट वरळीतील मटेरियल लॅब टेस्टिंग इमारतीच्या पुनर्विकासाच्या बांधकामात घातली आहे. रोबोटिक कार पार्किंग संदर्भात हा उत्पादित कंपनीसोबत करार असण्याची अट घालून एक प्रकारे संबंधित कंपनीच्या माध्यमातून काही ठराविक कंपनीने यात भाग घ्यावा आणि त्यालाच काम मिळविण्यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशीर आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हट्टासाठी खालच्या अधिकाऱ्यांनी उद्या आरोप होऊन तक्रार झाल्यास त्यात अटकायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

जी दक्षिण विभागातील एस. के. आहिरे मार्गावरील मुख्य अभियंता रस्ता कार्यालय व मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ईपीसी टर्नकी पद्धतीने काम करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. या पुनर्विकासाच्या कामात डिझाईन, अंडरग्राउंड पार्किंगसह मल्टिलेव्हल इलेक्ट्रो रोबो कार पार्किंग, एमईपी कामे, आतील सजावट, आयबीएमएस प्रणाली, सुरक्षा, लँडस्केपिंग कामे, रोबोटिक पार्किंगची देखभाल व त्याचप्रमाणे सध्याच्या मनपा कार्यालयांसाठी ट्रांझिट निवासाची रचना, बांधकाम इत्यादींचा समावेश आहे. तब्बल ४५० कोटींचे हे कंत्राट काम आहे. मात्र, या निविदेत रोबोटिक पार्किंग बनवणाऱ्या कंपनीशी करार सामंजस्याचा दस्तऐवज (एमओयू) मागविण्यात आला आहे. ज्या कंपनीकडे एमओयू असेल त्याच कंपनीला या निविदेत भाग घेण्याची अट यात आहे. त्यामुळे या निविदेत मिठी नदीतील कामाप्रमाणेच यात मोठा घोटाळा समोर येऊन खालच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावला जाणार आहे का भीती अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. (BMC)

(हेही वाचा – Ravindra Jadeja : भारतीय संघाच्या कप्तानीवर रवींद्र जडेजाला काय वाटतं?)

मिठी नदीच्या कामात शिल्ट पुशर मशीनचा वापर कोविड काळात सुरू करण्यास सुरुवात केली आणि या मशीनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत ज्या कंपनीचा करार असेल त्यालाच निविदेत भाग घ्यायला त्यांनाच काम देण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. काही अधिकारी अटकेत आहेत तर काही अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लागला आहे. त्यामुळे काही कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून मिठी नदी सारखी अट वरळीतील मटेरियल टेस्टिंग लॅब इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात टाकल्याने काही ठराविक कंपनीला काम मिळेल. पण भविष्यात याची तक्रार झाल्यास आणि त्याची चौकशी झाल्यास अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लागला जाणार आहे. (BMC)

यापेक्षा रोबोटिक पार्किंग बनवणाऱ्या कंपनीशी करार असेल तरच निविदेत भाग घेण्याची अट रद्द केल्यास निविदा प्रक्रिया पारदर्शक होईल आणि निविदेत जी कंपनी पात्र ठरेल, त्या कंपनीशी रोबोटिक कार पार्किंगची कंपनी संपर्क साधून काम करेल. पण निविदा प्रक्रिया जाणीव पूर्वक काही ठराविक कंपनीला काम देण्यासाठी आणि त्यात अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळत आहे. खुद्द या मिठी नदी प्रकरणात जो अनुभव आला आहे, ते पाहता असे चुकीचे काम करू नये आणि कुठल्या कंपनीला फायदा होईल अशाप्रकारे निविदा अट टाकली जाऊ नये आणि टाकलेली निविदा रद्द करावी अशी सूचना खुद्द अधिकाऱ्यांकडून करूनही प्रशासन ऐकत नाही. त्यामुळे या विभागातील अधिकारी प्रचंड तणावाखाली काम करताना दिसत आहेत. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.