Drain Water : मातोश्रीच्या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी वर्षाला सहा कोटींचा खर्च

61
Drain Water : मातोश्रीच्या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी वर्षाला सहा कोटींचा खर्च
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मोठ्या सहा पंपिंग स्टेशनसोबत तीन लघु पंपिंग अर्थात मिनी पंपिंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. कलानगर, किंग सर्कलमधील गांधी मार्केट आणि हिंदमाता परिसरातील साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशनच्या तीन वर्षांच्या देखभालीवर तब्बल १०० कोटींवर खर्च करण्यात येत आहे. यामध्ये मातोश्री अंगणात अर्थांत कलानगरमध्ये पाणी साचले जावून म्हणून कलानगरमध्ये कोविड काळात मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केली असून याठिकाणी पाणी साचले जावून नये म्हणून दरवर्षी सुमारे ६ कोटी रुपयांचा खर्च केला जत आहे. (Drain Water)

मुंबईत पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची ठिकाणांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी इर्ला, लव्हग्रोव्ह, हाजीअली, ब्रिटानिया आदी पंपिंग स्टेशनची उभारणी केली जात असली तरीही काही भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्यासाठी विविध ठिकाणी पंप बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये कलानगर परिसरात अर्थात मातोश्री भागांमध्ये पाणी तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी कोविड काळात मिठी नदीच्या परिसरात मिनी पंपिंग स्टेशन बांधण्यात आला. यामध्ये १००० घनमीटर क्षमतेचे १७ पंप आणि २४० क्षमतेचे ०४ पंप बसवण्यात आले आहे. या पंपांची देखभालीसाठी सन २०२५ ते सन २०२८ या कालावधीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून या साठी महाबल इन्फ्रा इंजिनअरींग कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Drain Water)

(हेही वाचा – Tamil Nadu सरकारचा हिंदूद्वेष; जात प्रमाणपत्रात वगळला जात आहे ‘हिंदू’ शब्दाचा उल्लेख)

कोविड काळात कलानगर येथील मिनी पंपिंग स्टेशनच्या धर्तीवर किंग सर्कल गांधी मार्केट परिसरात मिनी पंपिंग स्टेशन बनवण्यात आले आहे. या ठिकाणच्या पुढील चार वर्षांच्या कालावधीमध्ये २६.१६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी साज एंटरप्रायझेस कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर हिंदमाता आणि मडके बुवा परिसरातही मोठ्याप्रमाणात पंप बसवण्यात आले असून या पंपाद्वारे प्रमोद महाजन उद्यान आणि झेवियर्स मैदान परिसरातील भूमिगत टाक्यामध्ये पाणी वळते करण्यात येते. या पंपाकरताही पुढील चार वर्षांकरता सुमारे ५१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. (Drain Water)

कलानगर लघु पंपिग स्टेशन
  • पंप बसवण्याचा कालावधी : सन २०२५ ते सन २०२८
  • पंप बसवण्यासाठी येणारा खर्च : २४.७८ कोटी रुपये
  • कंपनीची नाव : महाबल इन्फ्रा इंजिनिअरींग कंपनी
  • १००० घनमीटर पंप : १७ पंप
  • २४० घनमीटर पंप : ०४

(हेही वाचा – Ujjain Love Jihad Case : मुस्लिम नफीस बनला ‘कानू’, हिंदू मुलीशी केली मैत्री, अन् नंतर म्हणाला…)

गांधी मार्केट, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव
  • पंप बसवण्याचा कालावधी : सन २०२५ ते सन २०२८
  • पंप बसवण्यासाठी येणारा खर्च : २६. १६ कोटी रुपये
  • कंपनीची नाव : साज एंटरप्रायझेस
  • ३००० घनमीटर क्षमतेचे : ०६ पंप
  • १००० घनमीटर क्षमतेचे :०२ पंप
  • ५०० घनमीटर क्षमतेचे : ०६ पंप
परळ हिंदमाता आणि मडके बुवा परिसर
  • पंप बसवण्याचा कालावधी : सन २०२५ ते सन २०२८
  • पंप बसवण्यासाठी येणारा खर्च : ५१.२५ कोटी रुपये
  • कंपनीची नाव : एआर ए आणि एएनसी संयुक्त भागीदार कंपनी
  • एकूण पंप : ०९ मोठे पंप (Drain Water)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.