
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील अनेक पुलांच्या स्थिरतेबाबत मुंबई व्हिजेटीआय या तज्ज्ञ संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर, पश्चिम उपनगरातील ३६ भुयारी रस्ते, स्कायवॉक आणि पादचारी आदी पुलांचे पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई आयआयटीकडून ऑडिट केले जाणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Shiv Sena Vardhapan Din : ‘तुमचा वर्धापन दिन आज नाहीच!’; शिवसेनेचा व्यंगचित्रातून शिवसेना उबाठावर हल्लाबोल)
मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महापालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर या रस्त्याची सुधारणा महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्व पादचारी भुयारी मार्ग, रस्ते वाहतूक भुयारी मार्ग आणि स्कायवॉक हे महापालिकेच्या ताब्यात आलेले असून या सर्व पूल आणि भुयारी मार्गाच्या स्ट्रक्चरल ऑडिट करता महापालिकेने व्हिजेटीआय संस्थेच्यावतीने नेमणूक केली होती. त्यानुसार ३५ पूल आणि भुयारी मार्गांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. (BMC)
(हेही वाचा – Iran-Israel War : इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्याचा इस्त्रायली सैन्याचा दावा)
या सर्व भुयारी आणि स्कायवॉकचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर केल्यानंतर या सर्व भुयारी आणि पादचारी पुलांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला असून या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील या पुलांच्या फेर स्ट्रक्चरल ऑडिटच्या तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी दिला. या फेरतपासणीसाठी आता मुंबई आयआयटीची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार पश्चिम द्रुतगती महामार्गावरील यासर्व पादचारी पूल आणि भुयारी मार्गाचे मुंबई आयआयटी मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असून या फेरतपासणीच्या अहवालानंतर या पुलांच्या दुरुस्ती तथा पुनर्बांधणीचा निर्णय घेतला जाईल असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community