CBSE Board : मुंबईत सीबीएसई मंडळाच्या आणखी ५ ते ६ शाळा वाढणार

सन २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्यावतीने सीबीएसई व आयसीएसईच्या प्रत्येकी एक शाळा school आणि सन २०२१-२२मध्ये सीबीएसईच्या १० शाळा सुरु करण्यात आल्या.

156
bmc school

मुंबई महापालिकेच्यावतीने सीबीएसई CBSE, आयसीएसई ICSE मंडळाच्या आणि केंब्रिज मंडळाशी संलग्न असलेली शाळा सुरु करण्यात आल्यानंतर आगामी शैक्षणिक वर्षात ५ ते ६ आणखी सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा विचार केला. सध्या सीबीएसई मंडळाच्या ११ शाळा असून विद्यार्थ्यांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आणखी काही या मंडळाच्या शाळा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सन २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्यावतीने सीबीएसई व आयसीएसईच्या प्रत्येकी एक शाळा school आणि सन २०२१-२२मध्ये सीबीएसईच्या १० शाळा सुरु करण्यात आल्या. या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत असून चार हजार जागांसाठी सुमारे दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे या शाळांना मिळत असलेल्या प्रतिसादानंतर महापालिकेने आणखी ५ ते ६ सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे.

bmc

सीबीएसई मंडळाच्या शाळांची संख्या वाढवण्याचा विचार

आपला पाल्य जागतिकीकरणात टिकून राहण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील पालक फक्त इंग्रजी माध्यमाच्याच नव्हे तर परवडत नसतानाही सीबीएसई CBSE, आयसीएसई ICSE व केंब्रीज मंडळाच्या शाळेत प्रवेश घेताना दिसत आहे. त्यामुळे या मंडळाच्या शाळा सुरु करण्याची गरज लक्षात घेऊन त्या सुरु करण्यावर भर दिला जात असून पालकांचा हा कल आणि वाढता प्रतिसाद लक्षात घेता नवीन ठिकाणी या सीबीएसई मंडळाच्या शाळांची संख्या वाढवण्याचा विचार आहे.

हेही पहा

महापालिका सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, महापालिकेला काही नवीन शालेय इमारती बांधून प्राप्त झाल्या आहेत व होत आहेत. या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेच्या ५ ते ६ सीबीएसई शाळा वाढवण्याचा विचार असून आगामी शैक्षणिक वर्षात सीबीएसई शाळांच्या संख्येत वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला. या शाळा कुठल्या भागात सुरू करता येईल आणि त्याला किती प्रतिसाद मिळेल याचा अभ्यास अहवाल शिक्षण विभाग करत आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करून आवश्यक शाळांची संख्या वाढवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा IT Sector : तरूणांनो लक्ष द्या! आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची घट)

शाळा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली

मागील शैक्षणिक वर्षांपासून माटुंगा पूर्व येथील एल.के. वागजी मार्ग महापालिका शाळेत ही केंब्रिज माध्यमाची शाळा सुरु केली असून महापालिकेच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सर्व सुविधा केंब्रिज मंडळाच्या महापालिका शाळेतही दिल्या जात आहेत. केंब्रिज बोर्डाची ही शाळा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा आहे आणि नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी तसेच प्रत्येक इयत्तेची एक तुकडी त्यात आहे. सन २०२२-२३नंतर प्रत्येक वर्षी नैसर्गिक वाढीने दहावी पर्यंतचे सुरु केली जाणार आहे.

  • सीबीएसई मंडळाच्या : ११ शाळा
  • आयसीएसई मंडळाच्या: ०१ शाळा
  • केंब्रिज मंडळाशी : ०१ शाळा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.