BMC : महापालिका म्हणते आता प्राथमिक आरोग्य सुविधांवर देणार भर; त्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

585
BMC : महापालिका म्हणते आता प्राथमिक आरोग्य सुविधांवर देणार भर; त्यासाठी घेतला 'हा' निर्णय
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या (BMC) नव्याने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे खासगीकरणाबाबत मुंबई महापालिकेने अखेर आपली भूमिका जाहीर केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी महापालिका रुग्णालयाचे खासगीकरण बाबत बोलतांना मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या वेगवेगळ्या स्वरुपाची जी सुपरस्पेशालिटी आहेत त्यावर खर्च होत असून, जी प्राथमिक आरोग्य सुविधा आहे, त्याला प्राधान्य दिले जात नाही. म्हणूनच अतिरिक्त बेड तयार होत आहेत, त्यावर खर्च करण्यापेक्षा, महापालिकेने तो निधी प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यावर दिला पाहिजे. त्यावर खर्च केला तरच त्याचा परिणाम होईल. त्याच विचाराने खासगी सहभाग तत्वावरील धोरण प्रस्तावित असले तरी आम्ही यामध्ये गडबड करणार नाही. सर्वांचा विचार ऐकूनच पुढचा निर्णय घेऊ असे जाहीर केले. (BMC)

(हेही वाचा – Ayushman Bharat Yojana : ४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ)

दादर येथील अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना, मुलाखतकार यांनी रुग्णालयांच्या खासगीकरणाबात विचारलेल्या प्रश्नावर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आपली जी काही अशी विचारसरणी आहे, ज्यात खासगीकरण म्हटल्यावर संकट आले. आता सगळे सगळे पळून नेणार, आमचे गरीब रुग्ण आजारी पडले की, त्यांना विचारणार नाही. हे असे का भीषण चित्र निर्माण केले जाते? हे मला कळत नाही. जे खासगी क्षेत्रात अत्यंत चांगल्याप्रकारे विकसित झाले आहे, त्याठिकाणी शासनाची भूमिका मर्यादीत राहिली पाहिजे, म्हणजे ज्या सेवा किफायतशीर पद्धतीने किंवा मोफत ज्या खासगी क्षेत्र देऊ शकत नाही, तेवढे संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, असे त्यांनी विषद केले. (BMC)

(हेही वाचा – Murshidabad मध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब आणि…; इथेच मुसलमानांनी हिंदूंना केलेले लक्ष्य)

मुंबई महापालिका (BMC) ही एकमेव महापालिका आहे ज्याची पाच मेडिकल पाच कॉलेज आहेत. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात एकूण १५,५०० खाटा (बेड) आहेत. आता खासगीकरणा हा घाट वगैरे नाही. १५,५०० बेड्समध्ये आज जी उपलब्धता आहे ती ६०टक्केच आहे. बऱ्याच वेळेला एका बेडवर दोन ते तीन रुग्ण असे चित्र दाखवले जाते. पण हे केवळ ठराविक वॉर्डात, ठराविक कळात जास्त गर्दी असते. पण या १५,५०० बेड्सना हात न लावता, जे अतिरिक्त बेड्स निर्माण होणार आहेत, त्या ३ हजार बेड्स वाढवताना, आज जरी साडेसात हजार कोटी रुपये महापालिका आरोग्य विभागावर खर्च करत असले तरीही जो खर्च आहे. तो प्राथमिक सुविधांवर खर्च व्हायला हवा. मेडिकल कॉलेज चालवल्या जात असल्याने हा जास्त खर्च सुपरस्पेशालिटीवर जास्त खर्च होतो. म्हणजे वेगवेगळ्या स्वरुपाची जी सुपरस्पेशालिटी आहेत त्यावर खर्च करणे, जी प्राथमिक आरोग्य सुविधेवर प्राधान्य दिले जात नाही. म्हणूनच असा विचार पुढे आला आहे. अतिरिक्त बेड तयार होत आहेत, त्यावर खर्च करण्यापेक्षा, महापालिकेने तो निधी प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर देत खर्च केला तर, त्याचा परिणाम होईल. मुंबईमध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत. त्यांची खासगी रुग्णालय आहेत. जर त्या टर्शली केअर पुरवू शकत असतील, तर खासगीकरण करून तो निधी जर आपल्याला मुंबईकरांना चांगल्याप्रकारे वापरता आला, तर त्यामध्ये आपल्याला अडचण असू नये. तरीही आम्ही यामध्ये गडगड करणार नाही, सर्वांचा विचार ऐकूनच पुढचा निर्णय घेवू,असे गगराणी यांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.