-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र शासन निर्णयाप्रमाणे ०१ जानेवारी २०२५ पासून महागाई भत्त्याचा तथा महागाई सहाय्याचा दर ५३ टक्के वरून ५५ टक्के प्रमाणे सुधारित करण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सध्या आकारण्यात येत असलेल्या महागाई भत्त्याच्या तथा महागाई सहाय्याच्या दरात ०१ जानेवारी २०२५ च्या प्रभावाने ५३ टक्के वरून ५५ टक्के अशी वाढ करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या पगारात ही थकीत महागाई भत्त्याची वाढीव रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Gadchiroli मध्ये ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक !)
हा महागाई भत्ता तथा महागाई सहाय्य हे महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना अनुज्ञेय असून माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही अनुज्ञेय असणार नाही. (BMC)
(हेही वाचा – ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; Shashi Tharoor यांना वगळणार?)
सुधारित महागाई भत्त्याची तथा महागाई सहाय्याची मे २०२५ या महिन्यासाठीची आकारणी, जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या महिन्यांच्या थकबाकीसह, संबंधित कर्मचाऱ्यांच्या तसेच निवृत्तीवेतनधारक तथा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मे २०२५ च्या मासिक वेतनपत्रकात तसेच निवृत्तीवेतनात करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याची तथा महागाई सहाय्याची रक्कम निश्चित करताना सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन विचारात घेतले जाणार आहे. विशेष भत्ता किंवा इतर कोणत्याही नावाने वेतनात समाविष्ट होणारी रक्कम विचारात घेतली जाणार नाही. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community