BMC : अतिक्रमणांमुळे सफेद पुलाशेजारील परिसरात पावसाळ्यात येतो पूर; कंत्राटदार नेमला, पण बाधित बांधकामे कधी हटणार?

226
BMC : अतिक्रमणांमुळे सफेद पुलाशेजारील परिसरात पावसाळ्यात येतो पूर; कंत्राटदार नेमला, पण बाधित बांधकामे कधी हटणार?
  • सचिन धानजी, मुंबई

अंधेरी कुर्ला जोड रस्ता येथील अॅडोर पॅलेस हॉटेल जवळील सफेद पूल नाल्याच्या अरुंद भागाचे अर्थात बॉटल नेक काढून या नाल्याचे रुंदीकरण तसेच खोलीकरण करून नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. या नाल्याच्या रुंदीकरणामध्ये तब्बल १५० हून अधिक कमर्शियल बांधकामे असून ही हटवल्याशिवाय या कामाला गती मिळणार नाही. त्यामुळे या नाल्याच्या रुंदीकरणासाठी कंत्राटदाराची निवड केली गेली असली तरी प्रत्यक्षात येथील बांधकामे हटवण्यात आलेली नसल्याने प्रत्यक्षात या भागातील पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्येतून स्थानिकांची सुटका पुढील काही वर्षे तरी होणे नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (BMC)

कुर्ला परिसरातील अंधेरी कुर्ला जोड रस्त्यावरील अॅडोर पॅलेस जवळील सफेद पूल नाल्याच्या भाग अरुंद आहे. बहुतांश भागातील पावसाचे पाणी वरच्या बाजूला उप नाला प्रणालीमधून वाहत येऊन मोठ्या नाल्यांना म्हणजेच सफेद पूल नाल्याला जावून मिळते. सफेद पूल नाला मोठा नाला असून तो अंधेरी-घाटकोपर जोड-रस्ता येथून सुरु होतो आणि हा नाला ९० फुट रस्ता, सत्यनगर पाईपलाईन रोड व कुर्ला-अंधेरी जोड ररता यांना ओलांडून मिठी नदीमध्ये जावून मिळतो. या सफेद पूल नाल्याचा एक भाग हा अॅडोर पॅलेस हॉटेल, अंधेरी-कुर्ला जोड रस्ता येथे अरुंद होवून पुढे छोट्या नाल्यांमधून हे पावसाचेपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी अॅडोर पॅलेस हॉटेल जवळील सफेद पूल नाल्याच्या अंधेरी-कुर्ला जोड रस्त्यावर पावसाळी पाणी साचून दरवर्षी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. (BMC)

(हेही वाचा – EDच्या प्रकरणात नवीन कायद्यांतर्गत फरार घोषित करणारी पहिलीच घटना; नेमकं प्रकरण काय वाचा)

त्यामुळे सफेद पूल नाल्याच्या अरुंद भागाचे सफेद पूल नाल्याच्या रुंदीकरण तसेच खोलीकरण करून त्याची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून ज्यामुळे पावसाळी पाण्याचा सहज व व्यवस्थित निचरा होऊ शकेल. तसेच, पावसाळ्यातील पूरसदृश्य परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून या कामासाठी इस्कॉन इन्फ्रोप्रोजेक्ट्स या कंपनीची निवड करण्यात आली. यासाठी सुमारे अडीच कोटीर रुपये खर्च केले जाणार आहे. हे काम पावसाळा वगळता आठ महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (BMC)

परंतु या नाल्याच्या रुंदीकरणामध्ये तब्बल १५० अधिक बांधकामे असून यामध्ये अधिक बांधकामे ही कमर्शियल स्वरुपाची आहे. मात्र, यासर्वांची पात्रता निश्चित करण्यात न आल्याने सन २०००च्या निकषानुसार हे पात्र ठरल्यास त्यांचे पुनर्वसन किंवा कुरार पॅटर्ननुसार याचा लाभ देण्याचा विचार प्रशासनाचा आहे. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब झाल्यास कंत्राटदाराची निवड करूनही प्रत्यक्षात याचे पुनर्वसन तसेच त्या बांधकामावर कारवाई होण्यास विलंब झाल्यास याच्या बांधकामाला अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदाराची निवड केली असली तरी प्रत्यक्षात येथील अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास नाल्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले जाऊ शकते आणि सफेद पुलाशेजारी तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमची सुटण्याऐवजी तशीच राहू शकते अशी भीतीही वर्तवली जात आहे. (BMC)

(हेही वाचा – शिंदेंच्या जाळ्यात ‘उरले-सुरले’ ही; Shiv Sena UBT मध्ये अस्वस्थता वाढली!)

वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रि पिमेंटा यांनी याबाबत बोलतांना मिठी नदीला जोडणाऱ्या प्रत्येक नाल्यांना अतिक्रमणांचा विळखा बसलेला असून ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याची कामे हाती घेतली जात असली प्रत्यक्षात ही बांधकामे हटत नाही तोवर या नाल्यांचे रुंदीकरण होणार नाही. ही सर्व बांधकामे कमर्शियल स्वरुपाची असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक ती हटवण्यामध्ये दिरंगाई केली जाते. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.