BMC : अंधेरी सब वेच्या ठिकाणी पंपिंग स्टेशन बनले तरीही…

482
Corporation Elections : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवं राजकीय समीकरण उदयास येणार?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले जावू नये यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC) पंपिंग स्टेशन तसेच विशेष पंपांची व्यवस्था केली जाते. परंतु आतापर्यंत हिंदमाता, मिलन सब वे येथील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांवरील पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असला तरी अंधेरी सब वेच्या ठिकाणी साचले जाणारे पावसाचे पाणी कायमच राहणार आहे. मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनची उभारणी केल्यानंतर सन २०२७च्या पावसाळ्यात दिलासा मिळणार असला तरी प्रत्यक्षात ही समस्या कायमस्वरुपी सुटणारी नाही. हिंदमाता आणि मिलन सब वेच्या ठिकाणचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवले जात असले तरी अंधेरी सब वेच्या ठिकाणी अशाप्रकारे भूमिगत टाक्या बांधण्याचा मार्गच नसल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात नाही पण काही प्रमाणात पाणी तुंबण्याची समस्या कायमच राहणारी आहे. (BMC)

मुंबईत मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसात अंधेरी सब वेच्या ठिकाणी पाणी साचले गेले. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC) पंप बसवले जात असले तरी समुद्राच्या मोठ्या भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास विलंब लागतो आणि परिसरात आहोटी येईपर्यंत पाणी कायमच राहते. याठिकाणच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोगरा नाल्यावर पंपिंग स्टेशनच्या बनवण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC)

(हेही वाचा – Punjab मध्ये खलिस्तानी कारवायांना ऊत; बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड)

महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम प्रस्तावित केले होते. अंधेरीतील मोगरा नाल्यावर बांधण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनची जागा खासगी असून सीआरझेडमध्ये असल्याने पर्यावरणीय परवानगीअभावी मागील १९ वर्षांपासून काम रखडले. यासाठी महापालिकेने (BMC) आतापर्यंत जागेची मुल्य म्हणून न्यायालयात ४५ कोटी रुपये भरले आहे. याबाबतच्या परवानगी आल्यानंतर या पंपिंग स्टेशनच्या बांधकामाकरता निविदा मागवून या जुलै २०२१मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १ ८ ते १९ वर्षांपासून अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपरिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरातील असलेली ही समस्या अजुनही कायमच राहणार आहे. आता पंपिंग स्टेशन नाल्यातच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याही जागेचा वाद आहे. त्यामुळे भविष्यात यावर खर्च करण्यात येणाऱ्या ३३० कोटी रुपयांच्या कामाला प्रत्यक्षात मार्च २०२५ कार्यादेश देण्यात आला आहे. याबाबतच्या पर्यावरण व इतर दोन परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (BMC)

महापालिकेच्या (BMC) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता खऱ्या अर्थाने अंधेरी सब वेच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यावर नियंत्रण आणल्या जाणाऱ्या मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनचे कामाला सुरुवात होईल. परंतु हे पंपिंग स्टेशन बांधले तरी भरतीच्या वेळेत येथील पाणी अन्यत्र जमा करून ठेवण्यासाठी हिंदमाता आणि मिलन सब वेच्या धर्तीवर भूमिगत टाक्या बांधणे आवश्यक असले तरी याठिकाणी कोणत्याही स्थितीत जागेची उपलब्धता नसल्याने अशी टाकी बांधता येत नाही. त्यामुळे पंपिंग स्टेशनचे काम २०२७ च्या पावसाळ्यात पूर्ण झाले तरीही काही प्रमाणात याठिकाणी पाणी साचून राहण्याचा प्रकार घडणार आहे. पण मोठ्याप्रमाणात जे पाणी साचून राहते ते कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था सुरु राहिल अशाप्रकारे याठिकाणी पाणी असेल, असेही बोलले जात आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.