BMC : विद्युत कामे करणारी कंपनी पकडणार भटक्या जनावरांना; कुठे चालली आहे मुंबई महापालिका?

112
BMC : महापालिका अभियंत्यांच्या डोक्यावरील संकट टळले; आयुक्तांनी काढून टाकायला लावली 'ती' अट 
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेची तिजोरीतील पैसा कुठल्याही प्रकारे काम करून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सध्या महापालिकेतील कंत्राटदारांकडून केला जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकची कामे करणाऱ्या कंपन्यांकडूनही आता मनुष्यबळ पुरवण्याची कंत्राटे घेतली जात आहे. गुरु ढोरे कोंडवाड्यांकरता मनुष्यबळ पुरवण्यासाठी चक्क विद्युत कामे करणाऱ्या अर्थात इलेक्ट्रिकची कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी निविदेत भाग घेवून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्युत कामे करणाऱ्या कंपन्या आता रस्त्यावरील भटक्या जनावरांना पकडण्याचे काम करताना दिसणार आहे. (BMC)

मुंबई महापालिकेत ठराविका कामाची स्पेशालिटी करणाऱ्या कंपन्या असल्या तरी कोणत्याही कंपन्या मिळेल त्या कामे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. वाहने पुरवणाऱ्या कंपन्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याच्या किंवा रस्ते आणि पर्जन्य जलवाहिनी विभागाची कामे करणाऱ्या कंपन्या उद्यान विभागाची कामे किंबहुना उद्यान विभागाची कामे करणाऱ्या कंपन्या पाणी खात्याची कामे अशाप्रकारची कामे करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्या कामांमध्ये ठराविक कंपन्यांची काय स्पेशालिटी आहे, हे जाणून न घेता ठराविक कंपन्यांना कामे देवून त्यांचे भले करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही कंपन्या कोणतीही कामे करताना दिसत आहेत. (BMC)

(हेही वाचा – BMC : भटक्या जनावरांना पकडण्याचा भार कंत्राटी कामगारांवर…)

त्यातच पशु वैद्यकीय विभागाच्यावतीने भटक्या जनावरांना पकडण्यासाठी गुरे ढोरे कोंडवाड्याकरता खासगी कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये चक्क यांत्रिक व विद्युत विभागांतर्गत विद्युत संदर्भातील काम करणाऱ्या कंपन्यांनी यात भाग घेतला. या निविदेमध्ये जे. आर. इंजिनिअरींग अँड सर्विसेस, इलेक्ट्रोकूल इंजिनिअरी आणि चैत्रा इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरींग या तीन कंपन्यांनी भाग घेतला होता. या निविदेत जे. आर. इंजिनिअरींग अँड सर्विसेस ही कंपनी पात्र ठरली तर इतर कंपन्यांना अपात्र ठरल्या. या कंपनीला दोन वर्षांकरता ९९ लाख १२ हजार रुपयांचे कंत्राट मंजूर करून देण्यात आले आहे. (BMC)

विशेष म्हणजे या सर्व कंपन्या विद्युत विभागांची कामे करणाऱ्या असताना भटक्या जनावरांना पकडण्यासाठी माणसे पुरवण्याची कामे करायला निघाल्याने महापालिका प्रशासन नक्की काय करते आणि महापालिकेची तिजोरीतील पैसा कुठल्याही प्रकारे आपल्याच खिशात जाण्यासाठी कंत्राटदार कशाप्रकारे कामे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आणखी एक नमुना समोर आला आहे. त्यामुळे विद्युत कामे करणाऱ्या कंपन्या जर भटक्या जनावरांना पकडणार असेल तर विद्युत कामे कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.