BMC : अर्धवट रस्त्यांची कामे सुस्थितीत आणण्याची डेडलाईन २५ मे; कामचुकार कंत्राटदारांना आकारणार दुप्पट दंड

125
BMC : अर्धवट रस्त्यांची कामे सुस्थितीत आणण्याची डेडलाईन २५ मे; कामचुकार कंत्राटदारांना आकारणार दुप्पट दंड
BMC : अर्धवट रस्त्यांची कामे सुस्थितीत आणण्याची डेडलाईन २५ मे; कामचुकार कंत्राटदारांना आकारणार दुप्पट दंड
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

सिमेंट कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्‍यानंतर रस्‍त्‍याचा काही भाग अपूर्ण असले तर ही कामे २० ते ३१ मे २०२५ दरम्यान मास्टिक अस्‍फाल्‍ट वापरून सुरक्षित अवस्थेत आणली जावीत. कंत्राटदाराने २५ मे २०२५ पर्यंत रस्ता सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी मास्टिक अस्‍फाल्‍टचे काम सुरू न केल्यास हे काम इतर उपलब्ध कंत्राटदारामार्फत संबंधित प्रकल्प ठेकेदाराच्या जोखीम व खर्चाद्वारे पूर्ण करण्यात यावे. हे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रकल्पस्थळ सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी केलेल्या खर्चाच्‍या दुप्‍पट रकमेएवढी दंडात्मक रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून आकारण्यात यावी,असे स्पष्ट निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी दिले आहेत.

रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबईत रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रभावीपणे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पर्यंत रस्ते कामे पूर्ण करण्याचे कालबद्ध नियोजन यापूर्वीच करण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिका (BMC) अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर (Abhijit Bangar) यांच्‍या आदेशानुसार, सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्‍यात आल्‍या आहेत. सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळ्यादरम्यान मुंबईकरांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, यास महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही बांगर यांनी निक्षून सांगितले आहे. त्‍याद्वारे सिमेंट कॉंक्रिट रस्ते वाहतुकीस खुले करण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत संबंधितांना महत्वपूर्ण सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देशही बांगर यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच Ajit Pawar यांनी अधिकाऱ्यांना झापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांपेक्षा व्यस्त झालात का?)

रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट कामकाज (सिमेंट काँक्रिट ओतणे) म्हणजेच पीक्यूसीचे काम २० मे २०२५ पासून बंद करण्यात आले आहे. २० मे २०२५ नंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन काम सुरू करू नयेत. पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिटची कामे २० मे २०२५ पर्यंतच पूर्ण केली जातील. २० मे २०२५ नंतर कोणतीही पीक्यूसीची (PQC) कामे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या संमतीशिवाय करण्यात येऊ नयेत. सुरू असलेली सर्व कामे ३१ मे २०२५ पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत.

ज्या प्रकल्प रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे, तेथील पर्जन्य जल वाहिन्या नीट स्वच्छ कराव्यात. पर्जन्य जल वाहिन्यांची जोडणी तपासावी. टँकरद्वारे पाणी टाकून पाण्याचा प्रवाह मुक्त आहे की अडथळा आहे, हे विभाग कार्यालय व पर्जन्य जल वाहिन्या विभाग कर्मचा-यांच्या उपस्थितीत तपासावे. तसेच, रस्‍ता वाहतुकीसाठी खुला करण्‍यापूर्वी रस्‍त्‍यांलगतच्‍या पावसाळी जलवाहिनीमध्‍ये प्रत्‍यक्षात पाणी टाकून त्‍यात अडथळा होणार नाही ना याची खात्री करावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

रस्त्यांवरील मलवाहिनी झाकणांची मनुष्य प्रवेशिका स्वच्छ करावी. कामाच्या वेळी पडलेले बांधकाम साहित्य तथा राडारोडा काढून टाकावा. जलप्रवाह सुरळीत आहे का, हे संबंधित विभागाच्या कर्मचा-यांच्‍या संयुक्त तपासणीतून सुनिश्चित करावे. सर्व पर्जन्य जल वाहिन्या तथा सांडपाणी मनुष्य प्रवेशिका झाकणे तपासावीत. झाकणे तुटलेली अथवा हरवलेली असल्याचे आढळल्यास ती तात्काळ बदलण्यात तथा बसवण्यात यावीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.