BMC : महापालिका अभियंत्यांच्या डोक्यावरील संकट टळले; आयुक्तांनी काढून टाकायला लावली ‘ती’ अट 

112
BMC : महापालिका अभियंत्यांच्या डोक्यावरील संकट टळले; आयुक्तांनी काढून टाकायला लावली 'ती' अट 
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मिठी नदीच्या कामांमध्ये जी चूक प्रशासनाने केली आहे आणि त्यामुळे महापालिकेचे अभियंते आता चौकशीच्या फेऱ्यात अडकू लागले आहे,अशाप्रकारची एक चूक मटेरियल टेस्टिंग लॅब इमारतीच्या पुनर्विकासात प्रशासन करायला निघाले होते. ज्यामुळे या कामांमधील अटच भविष्यात महापालिका (BMC) अधिकाऱ्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार मानली जात होती. परंतु याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून या चुकीच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाचे लक्ष वेधून घेताच आयुक्तांनी या पुनर्विकास कामांमधील निविदा अटच बदलून टाकली. त्यामुळे एकप्रकारे अभियंत्यांच्या डोक्यावरील तांगती तलवार निघून गेली असून किमान मिठी प्रमाणे चुकीच्या पद्धतीने केलेल्या निविदेमुळे अधिकाऱ्यांना भविष्यात चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची वेळ येणार नाही. (BMC)

जी दक्षिण विभागातील एस. के. आहिरे मार्गावरील मुख्य अभियंता रस्ता कार्यालय व मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ईपीसी टर्नकी पद्धतीने काम करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. या पुनर्विकासाच्या कामात डिझाईन, अंडरग्राउंड पार्किंगसह मल्टिलेव्हल इलेक्ट्रो रोबो कार पार्किंग, एमईपी कामे, आतील सजावट, आयबीएमएस प्रणाली, सुरक्षा, लँडस्केपिंग कामे, रोबोटिक पार्किंगची देखभाल व त्याचप्रमाणे सध्याच्या मनपा कार्यालयांसाठी ट्रांझिट निवासाची रचना, बांधकाम इत्यादींचा समावेश आहे. तब्बल ४५० कोटींचे हे कंत्राट काम आहे. मात्र, या निविदेत रोबोटिक पार्किंग बनवणाऱ्या कंपनीशी करार सामंजस्याचा दस्तऐवज (एमओयू) मागविण्यात आला आहे. ज्या कंपनीकडे एमओयू असेल त्याच कंपनीला या निविदेत भाग घेण्याची अट यात आहे. त्यामुळे या निविदेत मिठी नदीतील कामाप्रमाणेच यात मोठा घोटाळा समोर येऊन खालच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावला जाणार आहे का भीती अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. (BMC)

(हेही वाचा – Vishalgad Fort : विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला परवानगी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान; सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?)

मिठी नदीच्या कामात शिल्ट पुशर मशीन चा वापर कोविड काळात सुरू करण्यास सुरुवात केली आणि या मशीनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबत ज्या कंपनीचा करार असेल त्यालाच निविदेत भाग घ्यायला त्यांनाच काम देण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. काही अधिकारी अटकेत आहेत तर काही अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लागला आहे. त्यामुळे काही कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून मिठी नदी सारखी अट वरळीतील मटेरियल टेस्टिंग लॅब इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामात टाकल्याने काही ठराविक कंपनीला काम मिळेल. पण भविष्यात याची तक्रार झाल्यास आणि त्याची चौकशी झाल्यास अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लागला जाण्याची भीती अधिकाऱ्यांच्या मनात घर करून राहत होती. यापेक्षा रोबोटिक पार्किंग बनवणाऱ्या कंपनीशी करार असेल तरच निविदेत भाग घेण्याची अट रद्द केल्यास निविदा प्रक्रिया पारदर्शक होईल आणि निविदेत जी कंपनी पात्र ठरेल, त्या कंपनीशी रोबोटिक कार पार्किंगची कंपनी संपर्क साधून काम करेल. (BMC)

परंतु काही कंपन्यांना डोळयासमोर ठेवून निविदा अट घालण्याचा जो प्रयत्न झाला होता, याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने आवाज उठवला होता आणि याप्रकारची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर कुणाच्या तक्रारींनंतर चौकशी झाल्यास त्यात अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा फेरा लावला जाणार का असा सवाल केला जात होता. दरम्यान ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तानंतर आयुक्तांनी, अतिरिक्त आयुक्त तसेच इमारत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अशाप्रकारची अट असेल तर ती चुकीची असल्याने ही अट रद्द करण्यात यावी अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. नगर अभियंता विभागाला अशाप्रकारच्या सूचना केल्यानंतर मटेरियल टेस्टींग लॅब इमारतीच्या पुनर्विकासासाठी मागवलेल्या निविदेतील अटींमध्ये पुन्हा सुधारणा करून सुधारित अटींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. महापालिका नगरअभियंता महेंद्र उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोराही दिला आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.