BMC : वरळीतील लाईट हॉटेल कॅफेच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

514
BMC : वरळीतील लाईट हॉटेल कॅफेच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
BMC : वरळीतील लाईट हॉटेल कॅफेच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्यावतीने रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर येथील सनव्हिला इमारतीतील लाईट हाऊस कॅफेच्या च्या परिसरातील अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. या बांधकामांमध्ये भिंतीसह छताचे बांधकाम करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Cemetery : सहा महिन्यापूर्वी खुली, आता पुन्हा बंद करावी लागली खार दांडा स्मशानभूमी)

वरळी येथील डॉ एस बी रोडवरील सनव्हिला बिल्डींग येथे लाईट हॉटेल कॅफे म्हणून असलेल्या या परिसरातील मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामासंदर्भात महापालिकेने (BMC) नोटीस बजावली होती. त्यानंतर याप्रकरणी नगर दिवाणी न्यायालयात (City Civil Court) याचिका दाखल करण्यात आली होती आणि या बांधकामावर स्थगिती देण्यात आली होती. परंतु ही स्थगिती उठवल्यानंतर २४ एप्रिल २०२५ रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या निर्देशानुसार परिमंडळ उपायुक्त प्रशांत सपकाळे (Prashant Sapkale) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली इमारत आणि कारखाना विभागाच्यावतीने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. विटांचे बांधकाम आणि छत असलेली या शेडचे बांधकाम संबंधित विभागाची परवानगी न घेता बांधली होती.

महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश परिमंडळ उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दिल्यानंतर जी दक्षिण विभागातील ही दुसरी कारवाई ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.