Bmc budget 2024-25 महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा आणखी वाढणार; काय आहे कारण?

236

मुंबई महापालिकेच्या उत्पनाचे स्त्रोत असलेल्या प्राप्त होणाऱ्या महसुलाची रक्कम एकाबाजुला कमी होत असतानाच दुसऱ्या बाजुल हाती घेतलेल्या विकासकामांसह इतर पायाभूत सेवांवरील खर्च वाढत जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय (Bmc budget) अंदाज पत्रकाचा आकडा आता अजुन वाढला जाण्याची शक्यता असून यावर्षीच्या ५२ हजार ५५३ कोटी रुपयांच्या तुलनेत पुन्हा एकदा सहा ते सात हजार कोटींनीच वाढला जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबई महापालिकेने सन २०२३- २४च्या आर्थिक वर्षांकरता ५२५५३.७४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Bmc budget) महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मांडला. मात्र मागील काही वर्षांपासून भांडवली खर्च वाढत असल्याने अर्थसंकल्पाचा आकडाही वाढतच जात आहे.  त्यामुळे मागील काही वर्षांपासून अनेक प्रकल्प प्रत्यक्षात साकारु लागल्याने तसेच पुर्णत्वास येवू लागल्याने भांडवली खर्चाचा भार अधिकच वाढू लागला आहे. त्यातच आता कोस्टल रोड प्रकल्प हा शेवटच्या टप्प्यात असल्याने तसेच या वर्षांतच तो पूर्ण होत असल्याने यासाठी महापालिकेला प्रकल्प खर्चातील शिल्लक रकमेची  पूर्ण तरतूद करावी लागेल. त्यामुळे महापालिकेला साडेतीन हजार कोटींहून अधिक रुपयंची तरतूद करावी लागणार आहे.

(हेही वाचा Bmc budget 2024-25 मालमत्ता कराने वाजवले महापालिकेचे तीन तेरा)

साडेचार हजार कोटींची गरज भासणार

याबरोबरच रस्ते कामांसाठी साडेतीन हजार कोटींच्या तुलनेत साडेचार हजार कोटींची गरज भासणार आहे. मुंबई महापालिकेने सुमारे सहा हजार कोटींच्या रस्ते काँक्रिटची कामे हाती घेतली आहेत, तसेच छोट्या रस्त्यांसह पदपथ सुधारणेचीही कामे हाती घेतली आहे.  शिवाय पुल विभागाच्यावतीने विविध कामे हाती घेतल्याने यासाठीही साडेतीन हजार कोटींच्या घरात तरतूद करणे अपेक्षित आहे. त्या बरोबरच सुशोभीकरण व इतर का विकास कामे, प्रकल्प कामे आदी ही शेवटच्या टप्प्यात येत असल्याने महापालिका प्रशासनाला अर्थसंकल्पाचा आकडा वाढवावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आरोग्य विभागाचा खर्च वाढला जाण्याची शक्यता

आरोग्य खात्याच्यावतीनेही विविध सेवा, उपकरणे यासाठी करण्यात येणाऱ्या खर्चासह अनेक रुग्णालयांच्या पुनर्विकासाची कामे  शेवटच्या टप्प्यात असल्याने आरोग्य विभागाचा खर्च वाढला जाण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षण विभागाकरता सध्याच्या तुलनेत २०० ते ३०० कोटींची वाढ प्रस्तावित आहे. याबरोबरच जलअभियंता विभाग, पाणी प्रकल्प व मलनि:सारण प्रकल्पांची कामेही बरीचशी पूर्ण होत असल्याने यासाठीही भरीव निधीची आवश्यकता असल्याने यासाठी होणाऱ्या सर्व कामांसाठी भांडवली खर्च वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भांडवली खर्च २७ हजार कोटींच्या दर्शवला असला तरी येत्या अर्थसकल्पात (Bmc budget) हा भांडवली खर्च हा ३० ते ३१ हजार कोटींवर जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.