-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर-धारावी नाल्यातील तरंगता कचऱ्यामुळे प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, येथील तरंगता कचरा दररोज काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. वरळी ते हाजीअली परिसर यांच्यादरम्यान असलेल्या लव्हग्रोव्ह उदचंन केंद्र येथील (एलजीपी) नाल्यातील जुना दरवाजा तात्काळ निष्कासित करावा. तसेच, दादर-धारावी नाल्यातील तरंगता कचरा दररोज काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देशही डॉ. जोशी यांनी दिले आहेत. (BMC)
पावसाळापूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-२ हद्दीमधील विविध नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी शनिवारी १० मे २०२५ रोजी पाहणी केली. त्यावेळी पाहणीनंतर संबंधितांना त्यांनी विविध निर्देश दिले. उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर) (प्रभारी) विष्णू विधाते, सहायक आयुक्त (जी दक्षिण) स्वप्नजा क्षीरसागर, सहायक आयुक्त (एफ दक्षिण) महेश पाटील, सहायक आयुक्त (एफ उत्तर) अरुण क्षीरसागर, संबंधित अभियंता, अधिकारी तसेच कर्मचारी या दौऱ्यावेळी उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – Operation Sindoor मध्ये मसूद अझहरच्या भावासह पाच मोठ्या दहशतवाद्यांचा भारताने केला खात्मा )
विविध क्षेत्रात दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या वतीने नदी, नाले यामधून गाळ उपसण्यासाठी होणाऱ्या कामांमध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अर्थात ए आय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावीपणे होत आहे. या तंत्रज्ञानामुळे गाळ उपसा कामांची वास्तविक स्थिती कळण्यास प्रशासनाला मदत होत आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी शनिवारी लव्हग्रोव्ह उदचंन केंद्र, नेहरू विज्ञान केंद्र, दादर-धारावी टी जंक्शन, राजीव गांधी नगर, खारू खाडी, पेरी फेरी नाला-एमजीएल, हिंदमाता येथील नाल्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली. (BMC)
डॉ. जोशी यावेळी म्हणाल्या की, मुंबईत नदी-नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांमध्ये कोणतीही हयगय करू नये. तसेच पावसाळ्यापूर्वी दिलेल्या विहित कालावधीत नाला स्वच्छतेची सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, वरळी ते हाजीअली परिसर यांच्यादरम्यान असलेल्या लव्हग्रोव्ह उदचंन केंद्र येथील (एलजीपी) नाल्यात जुना दरवाजा असून हा दरवाजा तात्काळ काढून टाकावा. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community