Mega block : मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेवर रविवार २७ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावर (Harbor Line Megablock) आणि विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वे, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेणार आहे. (Mega block)
(हेही वाचा – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; Shirdi Airport वर ‘या’ सुविधा मिळणार)
कोणत्या रेल्वे सुरु कोणत्या बंद?
विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर सकाळी ८.०० वाजल्यापासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
यावेळी डाऊन मेल / एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 11055, 11061 आणि 16345 विद्याविहार स्थानक येथे डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानक येथे पाचव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. तसेच मेगाब्लॉकच्या कालावधीत १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील.
अप मेल / एक्सप्रेस ट्रेन क्रमांक 11010, 12124, 13201, 17221, 12126, 12140 आणि 22226 या गाड्या ठाणे स्थानक येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि विद्याविहार स्थानक येथे सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि ब्लॉक काळात त्या वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने चालतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर ११.१० वाजल्यापासून ते १६.१० वाजेपर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.४० वाजल्यापासून ते १६.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१६ वाजल्यापासून ते दुपारी १६.४७ वाजेपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ वाजल्यापासून ते दुपारी १६.४३ वाजेपर्यंत रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून ९.५३ वाजल्यापासून ते १५.२० वाजेपर्यंत शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी (Local Railway Mega block) सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून १०.४५ वाजल्यापासून ते १७.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
(हेही वाचा – BEST डेपोंच्या पुनर्विकासासाठी धोरण; उत्पन्नवाढीसाठी अत्याधुनिक सुविधांचा आग्रह)
ब्लॉक कालावधीत कुर्ला – पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे (Railway) प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community