BJP प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास मुदतवाढ

219
स्थानिक निवडणुकांसाठी BJP चा मेगा मास्टरप्लॅन; महाविकास आघाडीला गळतीचा धोका!
  • प्रतिनिधी

मंत्रालय शेजारील मोक्याच्या जागी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास ३० वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या भाडे कराराची मुदत आता ३१ डिसेंबर २०५४ पर्यंत राहणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; WAVES Summit 2025 चे करणार उद्घाटन)

१९८९ साली भाजपाच्या (BJP) प्रदेश कार्यालयासाठी मंत्रालय जवळील भारतीय जीवन विमा (एलआयसी) कार्यालयाच्या समोरील २ हजार ६८२ चौरस फूट आकाराची जागा भाडे कराराने देण्यात आली. या भाडे कराराला राज्य सरकारने वेळोवेळी मुदतवाढ दिली. या जागा वापराबाबतच्या भाडेकराराची मुदत ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपली होती. त्यामुळे १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०५४ अशा ३० वर्षाच्या भाडे करारास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – सागरी प्रकल्प, बंदरे, जेट्टी परिसरात अवैध बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिक आढळल्यास कसून चौकशी करा; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश)

भाडे कराराला मुदतवाढ देताना राज्य सरकारने प्रदेश भाजपाला (BJP) काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या प्रचलित दरानुसार सरकारला भाडे अदा करावे लागेल. विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम करणे बंधनकारक असणार आहे. भाडे आणि भाडे थकबाकी वसुलीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहरचे कार्यकारी अभियंता यांच्यावर देण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.